वसुधा धुरी ठरल्या पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसुधा धुरी ठरल्या
पैठणीच्या मानकरी
वसुधा धुरी ठरल्या पैठणीच्या मानकरी

वसुधा धुरी ठरल्या पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

८८६१३

वसुधा धुरी ठरल्या
पैठणीच्या मानकरी
बांदा ः महिला दिनानिमित्त सातोसे ग्रामपंचायत व महिला ग्रुप सातोसे यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत वसुधा वसंत धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर कावेरी पेडणेकर द्वितीय, शुभदा गवंडी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.कार्वेकर यांनी केले तर परीक्षण बाळकृष्ण खर्डे व प्रा. गवस यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर उद्घाटन मनीषा सातार्डेकर यांनी केले. यावेळी माजी सरपंच मदन सातोस्कर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंत धुरी, प्रसाद मांजरेकर, उपसरपंच रुपेश साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.


तोंडवळी आज
आरोग्य शिबिर
आचरा ः मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायत व एस. एस. पी. एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने तोंडवळी ग्रामपंचायत येथे उद्या (ता.१३) सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात, हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी, इ. सी.जी, बी. एस. एल, नेत्र तपासणी, बोन डीसीज, अस्थीरोग तपासणी, नेफोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा यांची तपासणी होणार आहे. या शिबिरासाठी तोंडवली सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, विष्णू गोसावी, विकास लुडबे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.