कासार्डे, पाटगाव शाळेचे समुहनृत्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डे, पाटगाव शाळेचे समुहनृत्यात यश
कासार्डे, पाटगाव शाळेचे समुहनृत्यात यश

कासार्डे, पाटगाव शाळेचे समुहनृत्यात यश

sakal_logo
By

88614
कासार्डे ः समूहनृत्य स्पर्धेत लहान गटात व्दितीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळीस्ते कांजीरवाडी शाळेला गौरविताना मान्यवर. (छायाचित्र ः एन. पावसकर)


कासार्डे, पाटगाव शाळेचे समुहनृत्यात यश

कासार्डेतील स्पर्धा; शिवजयंतीनिमित्त आयोजन

तळेरे, ता. १२ ः कासार्डे तिठ्ठा (ता.कणकवली) येथे नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या समूहनृत्य स्पर्धेत लहान गटात जिल्हा परिषद केंद्रशाळा कासार्डे क्रमांक १ व मोठया गटात जिल्हा परिषद केंद्रशाळा पाटगाव क्रमांक १ ने प्रथम क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे अनावरण व दिपप्रज्वलन सरपंच निशा नकाशे व उपसरपंच गणेश पाताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पाताडे, पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे आदी उपस्थित होते.
यावर्षी घेण्यात आलेल्या कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या समूहनृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद केंद्रशाळा कासार्डे क्रमांक १, व्दितीय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळीस्ते कांजीरवाडी, तृतीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरंबावडे तर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम पश्चिम यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. मोठ्या गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद केंद्रशाळा पाटगाव क्रमांक १, व्दितीय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उंबर्डे क्रमांक १, तृतीय जिल्हा परिषद केंद्रशाळा कासार्डे क्रमांक १ आणि उत्तेजणार्थ क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळेकरवाडी यानी प्राप्त केला. त्याचबरोबर ओझरम क्रमांक १, ओझरम मापारवाडी, नाधवडे, पेंढरी, बुरंबावडे या जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना मान्यवरांकडून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जमदाडे यांनी केले.