पावस-सौ. रसिका पाडाळकरांनी पटकावली मानाची पैठणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-सौ. रसिका पाडाळकरांनी पटकावली मानाची पैठणी
पावस-सौ. रसिका पाडाळकरांनी पटकावली मानाची पैठणी

पावस-सौ. रसिका पाडाळकरांनी पटकावली मानाची पैठणी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१२p२४.jpg- KOP२३L८८६४९ कुवारबाव (ता. रत्नागिरी) ः खेळ पैठणीचा स्पर्धेत सहभागी स्पर्धक.

रसिका पाडाळकरांनी पटकावली मानाची पैठणी
कुवारबाला खेळ पैठणीचा ; पाच महिलांचा कुसुमताई अभ्यंकर पुरस्काराने गौरव
पावस, ता. १२ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव येथे महिलांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे खेळ पैठणीचा या कार्यक्रम उत्साहात झाला. खेळ पैठणीचा कार्यक्रमात सौ. रसिका अमित पाडळकर यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या ठरलेल्या सौ. आरती लखन पावसकर यांना चांदीचा कुंकवाचा करंडा देऊन गौरविण्यात आले.
स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब व माजी आमदार बाळ माने आणि कुसुमताई अभ्यंकर पतसंस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये १०० महिला सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे उदघाटन सौ. माधवी माने यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार बाळ माने, श्रीमती तेजा मुळ्ये, तेज नलावडे, धनंजय जोशी, दीपक आपटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कुवारबाव व परिसरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती भारती जोशी, धनश्री पलांडे, अपेक्षा सुतार, सौ. आदिती भावे, सौ. राजश्री भाट्ये यांना सन्मानचिन्ह, शाल व चांदीचे फुल देऊन कुसुमताई अभ्यंकर पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. अनुश्री आपटे, सौ. विक्रांती केळकर, सरपंच सौ. मंजिरी पडाळकर, राखी केळकर, सौ. नेहा आपकरे आदी महिलांनी खूप मेहनत घेतली.
तसेच पाककला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये वरीपासून (भगर) गोड पदार्थ बनवण्यामध्ये सौ. पुनम काटकर यांनी प्रथम, सौ. साक्षी पाटील यांनी द्वितीय आणि सौ. प्रज्ञा फडके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.