विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून कर्जमुक्ति मेळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून कर्जमुक्ति मेळावे
विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून कर्जमुक्ति मेळावे

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून कर्जमुक्ति मेळावे

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१२p१९.jpg-KOP२३L८८६४४
रत्नागिरी ः विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचा मेळाव्यात कर्जदारांशी संवाद साधताना.


विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून कर्जमुक्ती मेळावे
१३ ठिकाणी एकावेळीच आयोजन ; ३०० जणांकडून तडजोडीने वसुली
रत्नागिरी, ता. १२ ः कर्ज फेड करण्यात अडचणी असलेल्या खातेदारांसाठी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून सुट देण्याचा निर्णय घेतला गेला. बँकेने तेरा ठिकाणी कर्जमुक्ती मेळावे आयोजित केले होते. त्यामध्ये ३०० ऋण खात्यात तडजोडीने कर्ज वसूल झाली आहेत.
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक आयोजित कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन एकाच दिवशी म्हणजेच १० मार्चला अकोला, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, सोलापूर आणि रत्नागिरी विभागात वेगवेगळ्या जागांवर करण्यात आले होते. रत्नागिरीतील करबुडे, देवळे, आबलोली, निवळी आणि रत्नागिरी शाखांचा त्यात सहभाग होता. त्यासाठी रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक कमाल शेख आणि संबंधित शाखेचे सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. बँकेकडून कर्ज प्राप्त केल्यावर, परतफेडीचे वचन दिल्याप्रमाणेच कर्जाची परतफेड होते असे नाही. मागील तीन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कर्जफेडीत अडचणी आल्या होत्या. अशावेळी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने अडचणीत आलेल्या थकीत खातेदारांसाठी महत्वाचा निर्णय घेत विशेष सुट, सुविधा दिल्या आहेत. त्यासाठी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन केले. बँकेचे अध्यक्ष विजय वर्मा यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला. कर्जमुक्ती मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३०० ऋण खात्यात सुमारे नऊ कोटी रुपये प्रकरणांत तडजोड झाली आहे. ऋण मुक्ती मेळाव्याचे सर्व स्तरांवर स्वागत होत असून अशाच प्रकारे अजून मोठ्या संख्येने मेळावे आयोजित करावे अशी मागणी सामान्य ऋण खातेदारांकडून होत आहे.
विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे अध्यक्ष विजय कुमार वर्मा, महाप्रबंधक विमल कुमार, तसेच महाप्रबंधक अनिल कुमार श्रीवास्तव यांनी ऋणमुक्ती मेळावे सफल करण्यासाठी बँकेचे सर्व क्षेत्रीय प्रबंधक, शाखा प्रबंधक यांचे अभिनंदन केले आहे.