देवरुखात कचरा टाकणाऱ्यांवर वॉच

देवरुखात कचरा टाकणाऱ्यांवर वॉच

पान 5 साठी

88645

देवरुखात कचरा टाकणाऱ्यांवर वॉच
सीसीटीव्हीसह नागरिकांची नजर; सहा हजाराची दंड वसुली
साडवली, ता. 12 : देवरूख शहरवासीयांनो आपण कचरा कुठेही टाकलात तर यापुढे तुमच्यावर लक्ष राहणार आहे. यापुढे सावधानता बाळगा. देवरुखातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हे काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
देवरूख शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आपलं देवरूख, सुंदर देवरूख असे अभियानाचे नाव आहे. आठवडा झाला हे नागरिक शहरात फिरून जनजागृती व सकाळी एक तास कचरा उचलत आहेत. काही ठिकाणी स्वयंसेवक लक्ष ठेवून आहेत. सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सकाळी, रात्री काही नागरिक कचरा बाहेर रस्त्यावर टाकताना आढळले असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. हे काम जागरुक नागरिक स्वयंस्फूर्तीने करत आहेत. नगरपंचायतीने या नागरिकांना अधिकार दिले आहेत. प्लास्टिक पिशवी वापर व बाहेर टाकणारा कचरा यावर हे नागरिक लक्ष ठेवून आहेत. चोरपर्‍या, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरक चौक, साखरपा रोड या मार्गावर राजरोस कचरा टाकणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कचऱ्‍यातून वीजबिले, औषधांचे कागद, शाळा ओळखपत्र, वाढदिवसाला मिळालेली पाकिटे या नावावरुन कचरा टाकणारे नागरिकांची ओळख पटली आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली आहेत. वाहनांचे नंबरही मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा बाहेर टाकताना विचार करावा, असे आवाहन दक्षता कमिटीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com