ओव्हरलोड वाहतूक धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओव्हरलोड वाहतूक धोकादायक
ओव्हरलोड वाहतूक धोकादायक

ओव्हरलोड वाहतूक धोकादायक

sakal_logo
By

88654
ओरोस ः उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर करताना फिलिप्स रॉड्रिक्स.


ओव्हरलोड वाहतूक धोकादायक

फिलिप्स रॉड्रिक्स; आरटीओस निवेदन, आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः सिंधुदुर्गातून गोवा येथे भरधाव वेगाने ओव्हरलोड खडी व वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनचालकास समज देऊनही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. अपघात व जीवितास धोका निर्माण झाल्याने येत्या सात दिवसात ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, अन्यथा इन्सुली चेक नाक्यावर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना इन्सुली मतदारसंघ विभाग प्रमुख फिलिप्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला.
इन्सुली चेक नाक्यावरून तसेच नजीकच्या इतर गावातून राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. काही वेळा दोन ब्रास रॉयल्टी भरून चार ब्रासची वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून संबंधित कंपन्या स्वतःच्या तिजोऱ्या भरत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी या ठिकाणी लहान-मोठे अपघातही वाढले आहेत तसेच वाहने भरधाव वेगाने जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक सात दिवसांच्या आत बंद करावी, अन्यथा इन्सुली चेकनाक्यावर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे शिवसेना विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला.