rat1229.txt

rat1229.txt

----
फोटो ओळी
- rat12p21.jpg-KOP23L88646
रत्नागिरी ःशहरातील पेठकिल्ला-कोठारवाडी येथील बाळगोपाळ ढोल ताशांच्या गजरात रंगपंचमी साजरी करताना.
- rat12p22.jpg- ओळी ः KOP23L88647
पेठकिल्ला-सांबवाडी येथे रंगपचमी उत्साहात साजरी झाली.
- rat12p23.jpg- KOP23L88648
शहराजवळील कुवारबाव येथील रत्नसागर सोसायटी येथे सर्वांनी एकत्रित रंगपंचमी साजरी केली

---

रंगात रंगले अबालवृद्ध

जिल्ह्यात रंगपंचमीचा उत्साह ; दुपारनंतर शहरात शुकशुकाट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः शहरातील श्री भैरी बुवा देवस्थानच्या शिमगोत्सवाची सांगता आणि रंगपंचमी नागरिक व बालगोपाळांनी उत्साहात साजरी केली. पेठकिल्ला, लक्ष्मीचौक, गोखले नाका, तेली आळी या परिसरातील नागरिक रंगपंचमीत सहभागी झाले होते. दुपारी तीन वाचल्यापासून शहरात मुलांनी पिचकाऱ्या घेऊन गल्ली-गल्लीत रंगपंचमी खेळण्यास सुरवात केली होती.
चार वाजल्यापासून तरुण मंडळी या रंगपंचमीसाठी सक्रीय झाले. ढोल ताशांच्या गजरात पेठकिल्ला, सांबवाडी ते मुरुगवाडा भैरी मंदिर परिसरात रंगपंचमी खेळताना दिसत होते. मात्र यावर्षी रंगपंचमीला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. साळवीस्टॉप, मारुती मंदिर या परिसरात रस्त्यावर रंगपंचमी खेळणाऱ्या युवकांचा सहभाग कमी जाणवत होता. शहरात दरवर्षी रस्त्यावरील दुकाने चार वाजल्यापासून बंद होतात. पण साळवी स्टॉप ते बसस्थानकापर्यंत दुकाने उघडी होती. मात्र रामआळी, गोखले नाका येथील काही दुकाने दुपारनंतर नागरिकांनी बंद ठेवली होती. भैरी देवस्थानच्या शिमग्याची सांगता असल्याने मोठ्या संख्येने नागरिक भैरी मंदिराकडे जाताना दिसत होते. विविध रंगाची उधळण करताना ढोल-ताशांच्या गजरात तरुणांनी रंगपंचमीचा उत्साहा द्विगुणीत केला. दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट होता. मुख्य रस्त्यावर रंगपंचमी खेळणारे दिसत नव्हते. पण बसस्थानक आणि त्याखालील परिसरात रंगपंचमी खेळणारे आनंदोत्सवात रंगलेले होते. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर तरुणाईचा आनंद ओसंडून जात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com