
चिपळूण - चिपळूणात रंगपंचमीचा उत्साह
फोटो ओळी
-rat१२p३०.jpg -KOP२३L८८६६८
चिपळूण ः शहरातील गोवळकोट भागात रंगपंचमी साजरी करताना बालदोस्त
------
चिपळुणात रंगोत्सव उत्साहात
चिपळूण, ता. १२ ः ‘बुरा ना मानो, होली है’ असे म्हणत चिपळूण शहर व उपनगरांमध्ये रविवारी (ता. १२) रंगोत्सव साजरा करण्यात दंग झाले होते. आदल्या रात्री खेंड येथे डीजेवर तरुणाई बेभान होऊन थिरकली. दुसऱ्या दिवशी शहरात लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत आनंदाला उधाण आले होते. गावांमध्येही चौकाचौकात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगपंचमीसाठी मागील आठवडाभरापासून बाजारपेठ सजली होती. पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग, फुगे, मुखवटे यांची विक्री जोरात होती. रविवारी सकाळपासूनच बालचमूंनी रंगाची उधळण सुरू केली. काही ठिकाणी डीजेचे सेट उभारण्यात येत होते. सकाळी १० नंतर रंगपंचमीला सुरवात झाली. शहराची बाजारपेठ दुपारपासून बंद होती. मेडीकल, किराण माल, भाजीपाल्याची दुकाने दुपारनंतर बंद करण्यात आली. शहरातील अपार्टमेंटमध्ये तसेच गल्लीबोळात आज रंगपंचमी खेळताना नागरिक दिसून आले. गल्लीत एखादी व्यक्ती दुकाचीकरून जात असेल तर त्याला थांबवून त्याला रंग लावले जात होते. तर काही ठिकाणी चालत्या गाड्यांवर रंग उडवला जात होता.