पाचव्या दिवशीही तोडगा नाही

पाचव्या दिवशीही तोडगा नाही

88669
वैभववाडी ः येथील महिला उपोषणकर्त्याशी महिला पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

पाचव्या दिवशीही तोडगा नाही

वैभववाडीत स्टॉलधारकांचे उपोषण चिघळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः शहरातील महिला स्टॉलधारकांनी महिला दिनापासून सुरू केलेले उपोषण आज पाचव्या दिवशी कायम आहे. पाच दिवसांत अपेक्षित कोणताही निर्णय न झाल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील हटविलेल्या स्टॉलमुळे आमची रोजीरोटी हिरावली गेली असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देईपर्यत त्याच जागी स्टॉल उभे करावेत, या मागणीसाठी २० ते २२ महिला स्टॉलधारकांनी येथील तहसील कार्यालयासमोर महिला दिनापासून उपोषण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी मुख्याधिकारी सुरज कांबळे आणि दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. बैठकीत ठरल्यामुळे कायमस्वरूपी जागा स्टॉलधारकांना देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे; परंतु, त्याला काही अवधी लागणार असल्याचे सांगत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती; परंतु, तरीही स्टॉलधारक आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. जोपर्यंत जागा देण्याबाबत आणि तात्पुरते स्टॉल लावण्यासाठी लेखी दिले जात नाही, तोपर्यंत उपोषण स्थगित न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. त्यानुसार आज पाचव्या दिवशी देखील महिला उपोषणास बसलेल्या आहेत. आज सायंकाळी नगरसेविका अक्षता जैतापकर, माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, डॉ. दिपा पाटील यासह विविध महिलांनी उपोषणकर्त्या महिलांशी चर्चा करीत विचारपुस केली; परंतु, महिलांनी जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. आजचा आंदोलनाचा पाचवा दिवस असून पाच दिवसांत कोणताही निर्णय न झाल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com