तळेरेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव
तळेरेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव

तळेरेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव

sakal_logo
By

88670
कणकवली ः येथील महिला दिन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.

तळेरेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव
तळेरे ः आपण सर्वजण आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यामुळे कौतुकास पात्र आहातच, तरीही स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा. कुणाच्या हातातल्या बाहूल्या होऊ नका, असे प्रतिपादन अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी केले. त्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे काल (ता.११) आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री अक्षता कांबळी, विशेष अतिथी माजी नगरसेविका नीलम पालव, नगरसेविका कविता राणे, दीपा सरूडकर, दिव्या साळगावकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबातील महिलांचा गौरव करण्यात आला. कामगार कल्याणचे संतोष नार्वेकर हे नेहमीच तळागाळातील कार्यशील महिला शोधून त्यांच्या कार्याचा गौरव करतात म्हणून कांबळी यांनी नार्वेकर यांचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.