दहा दिवस पारा 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवस पारा 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान
दहा दिवस पारा 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान

दहा दिवस पारा 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान

sakal_logo
By

फोटो ओळ- rat१२p२८.jpg-KOP23L88683 रत्नागिरी ः उन्हाच्या काहीलीने त्रस्त नागरिक दुपारी ज्युस सेंटरवर हजेरी लावत आहेत.
---------------
दहा दिवस पारा ३५ अंशावर
उष्णतेच्या लाटेचा परिणाम ; हापूसच्या तिप्पट पेट्या वाशीत
रत्नागिरी, ता. १२ ः उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहिला. गतवर्षी मार्च महिन्यात सुरवातीला अशीच स्थिती होती. उन्हामुळे पहिल्या टप्प्यातील हापूस आंब्याची काढणी वेगाने सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातून कमी पेट्या जात आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा उष्णतेचा प्रभाव लवकर जाणवू लागला. फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण राहिल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. कोकणातील महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दापोलीमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा ३६ अंश सेल्सिअस पार करुन पुढे गेला आहे. महाशिवरात्रीला म्हणजेच १७ ते १९ फेब्रुवारीला पारा रत्नागिरी तालुक्यात ३७ अंशावर गेले होते. उन्हाच्या झळांनी कोकणवासीय चांगलेच त्रस्त झाले आहेत. नियमित तापमानापेक्षा तीन अंश सेल्सिअसने पारा वर सरकरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मार्चच्या पहिल्या दहा दिवसात सलग काही दिवस ३५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा स्थिर राहीला आहे. मागील दहा वर्षात असे चित्र पाहायला मिळालेले नाही. दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा सर्वाधिक जाणवतात. कातळावर त्याची तीव्रता अधिक असते.
-----
चौकट
वाशीत विक्रमी ४७ हजार पेटी आंबा दाखल
वाशी मार्केटमध्ये शनिवारी विक्रमी ४७ हजार पेटी आंबा दाखल झाला. त्यातील २७ हजार पेट्या कोकणातील होत्या. उर्वरित पेट्या अन्य राज्यातून आलेल्या होत्या. गतवर्षी याच कालावधीत दहा हजार पेट्या वाशीत कोकणातून जात होत्या. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक आंबा जात आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्याचे प्रमाण चार हजाराच्या दरम्यान असल्याचे वाशीतील व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले. १५ मार्चनंतर रत्नागिरीतून आंबा मोठ्या प्रमाणात जाईल.
----------
कोट
वातावरणातील बदलामुळे यंदा हापूस उत्पादनात सातत्य राहणार नाही. उत्पादन कमी-अधिक राहणार. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पीक कमी राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार


चौकट
कोकण कृषी विद्यीपाठाने नोंदवलेले दापोलीतील तापमान
तारीख*कमाल तापमान*किमान (अं.सें.)
* १२ मार्च*३६.८*१७.७
* ११ मार्च*३५.२*१५.५
* १० मार्च*३५.८*२०.३
* ०९ मार्च*३४.५*२०.४
* ०७ मार्च*३६.७*२०.६
* ०६ मार्च*३६.३*१५.६
* ०५ मार्च*३६.२*१६.०
* ०४ मार्च*३६.३*१६.८
* ०३ मार्च*३५.८*१४.३
* ०२ मार्च*३४.८*१७.२
* ०१ मार्च*३३.२*१३.३