रिक्षा-मोटार अपघातात जामसंडेत एक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा-मोटार अपघातात
जामसंडेत एक गंभीर
रिक्षा-मोटार अपघातात जामसंडेत एक गंभीर

रिक्षा-मोटार अपघातात जामसंडेत एक गंभीर

sakal_logo
By

88673
जामसंडे ः येथे रिक्षा आणि मोटारीमध्ये अपघात झाला.

रिक्षा-मोटार अपघातात
जामसंडेत एक गंभीर
देवगड ः जामसंडे खाकशी तिठा परिसरात रिक्षा आणि मोटारीमध्ये झालेल्या अपघातात तालुक्यातील नाडण येथील रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. जखमीला येथील प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले. रिक्षातील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. हा अपघात काल सकाळी अकराच्या सुमारास देवगड-नांदगाव रस्त्यावर जामसंडे खाकशी तिठा परिसरात घडला. अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रिक्षा नांदगावच्या दिशेने निघाली होती. रिक्षात एक महिला आणि तिचे लहान मुल होते. रिक्षा जामसंडे खाकशी तिठा परिसरात आली असता समोरून नांदगावकडून देवगडच्या दिशेने येणारी मोटार आणि रिक्षामध्ये धडक बसली. यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमी रिक्षा चालकावर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले. रिक्षातील प्रवाशी महिला आणि तिचे लहान मुल यांच्यावर येथे उपचार करण्यात आले. देवगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.