खेड-संक्षिप्त

खेड-संक्षिप्त

धामणीत क्षेत्रीय किसान गोष्टी उपक्रम
खेड : धामणी येथे शेतकरी प्रकाश महाडिक यांच्या शेतावर किसान गोष्टी हा उपक्रम घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी कोळप यांनी हवामानामुळे फळ पिकावर होणारे परिणाम व त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी महाडिक यांनी ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, महाडीबीटी यांत्रिकीकरण तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ याबाबत माहिती दिली. कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर जगताप यांनी आंबा, काजू व नारळ पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शिवार फेरी काढण्यात आली. शेतामध्ये शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या वेळी धामणीच्या सरपंच शिंदे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अनुष्का मोहिते, ग्रामपंचायत सदस्य काजारे, मंडल कृषी अधिकारी शिंदे, घाणेकर, कृषी पर्यवेक्षक बिरनाळे, कृषी सहायक दिवाळे, कणसे, निकम, धांडे, जाधव, सोनवणे आदी उपस्थित होते.


खोपीत ३२२ रुग्णांची मोफत तपासणी
खेड ः तालुक्यातील खोपी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर झाले. यामध्ये ३२२ विविध आजार असलेल्या रुग्णांची मोफत उपचार व तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, आरोग्य विभाग, खोपी ग्रामस्थ, तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हे शिबिर घेण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरामध्ये हाडांचे विविध आजार, मेंदूचे विविध आजार, मणका, छातीचे आजार, कान, नाक, घसा, डोळ्यांचे आजार, कॅन्सर, स्त्री रोग व प्रसुती, वंध्यत्व निवारण, अपेंडिक्स व हर्निया आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com