वारीशे मृत्यूप्रकरणी संशयितांच्या
जामिनावर बुधवारी होणार सुनावणी

वारीशे मृत्यूप्रकरणी संशयितांच्या जामिनावर बुधवारी होणार सुनावणी

पान ३ साठी

वारीशे मृत्यूप्रकरणी संशयितांच्या
जामिनावर बुधवारी होणार सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. १५ मार्चला त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरिल कोदवली पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर ६ फेब्रुवारी २०२३ ला शशिकांत वारीशे यांचा थार गाडीच्या धडकेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संशयिताविरुद्ध दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी संशयित आंबेरकर याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार राजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल आहे.

जमावाची तरुणाला मारहाण, पाच जणांवर गुन्हा
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील हातिवले येथील किराणा मालाच्या दुकानात बेकायदेशीर जमाव करून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संकेत कदम, जितू कदम, संकेत कदमची आई आणि त्यांची बायको (सर्व रा. आदर्शनगर-हातिवले, ता. राजापूर) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास हातिवले-आदर्शनगर येथील एका किरणामालाच्या दुकानात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परेश विलास मांजरेकर (वय २९, रा. आदर्शनगर-हातिवले, ता. राजापूर) हे व संशयित हे एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत. त्यांच्या जमीन जागेवरून वाद आहेत. शुक्रवारी संशयित संकेत हे धावलकर यांच्या जागेतील लाकडे तोडत असताना त्या ठिकाणी परेश मांजरेकर यांच्या वडिलांनी लाकडे तोडू नका, मालक आम्हाला विचारतात असे संकेतला सांगितले. याचा राग येऊन संशयितांनी त्यांना शिवीगाळ केली, तर परेश हे किराणादुकानात असताना त्यांना हाताने मारहाण केली. मारहाण सोडविण्यासाठी आलेल्या परेशच्या आई व बहिणीला शिवीगाळ केली. या मारहाणीत परेश मांजरेकर जखमी झाले. या प्रकरणी त्यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राजापूर पोलिस अमंलदार करत आहेत.

वृद्धेच्या खूनप्रकरणी
संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी ः देवरूख (ता. संगमेश्वर) येथे आईचा खून करून पाण्याच्या टाकीत मृतदेह टाकल्याचा आरोप असलेल्या तरुणाचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. दीपक दत्तात्रय संसारे (वय ४२, रा. क्रांतिनगर, देवरूख) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली होती. संशयिताने दागिन्यांच्या हव्यासापोटी आईचा खून केला. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दीपकच्या जामिनावर निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अॅड. वर्षा प्रभू यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार देवरूख-क्रांतिनगर येथे एका रहिवासी इमारतीमध्ये पाण्याच्या टाकीत शारदा दत्तात्रय संसारे (वय ८०) यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुलगा दीपक संसारे याने देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com