दुचाकी पळवण्याचा प्रयत्न फसला

दुचाकी पळवण्याचा प्रयत्न फसला

दुचाकी पळवण्याचा प्रयत्न फसला
सावंतवाडी, ता. १२ ः सातार्डा-घोगळवाडी येथे शबयच्या बहाण्याने पार्क केलेली दुचाकी पळवण्याचा अज्ञाताने प्रयत्न केला; मात्र, ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे दुचाकी तीन तासानंतर पालवनवाडी माळरान परिसरात सापडली. हा प्रकार काल (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास घडला.
सातार्डा-घोगळवाडी येथील शुभम सगुण आसोलकर यांनी दुचाकी दुपारी चावीसह घराच्या बाजूला उभी केली होती. दुपारी शबयसाठी आलेल्या एका अज्ञाताने ती दुचाकी पळवून नेली. आसोलकर यांनी शोधुनही दुचाकी सापडली नाही. देऊळवाडी येथे थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांनी आसोलकर यांची दुचाकी एक अज्ञात नेत असल्याचे ओळखून त्यांना फोन केला. तोपर्यंत अज्ञाताने दुचाकी पालवनवाडी माळरान परिसरात लपवली होती. पालवनवाडीतील माळरान परिसरात असलेल्या एका काजूच्या झाडाखाली आसोलकर यांची दुचाकी सर्वेश पेडणेकर व निखिल पेडणेकर यांना सापडली. मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे ही दुचाकी सापडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com