महर्षी कर्वेच्या 75 विद्यार्थिनींनी अनुभवला केविंगचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महर्षी कर्वेच्या 75 विद्यार्थिनींनी अनुभवला केविंगचा थरार
महर्षी कर्वेच्या 75 विद्यार्थिनींनी अनुभवला केविंगचा थरार

महर्षी कर्वेच्या 75 विद्यार्थिनींनी अनुभवला केविंगचा थरार

sakal_logo
By

rat१३१२.txt

बातमी क्र.. १२ (टुडे ३ साठी)

- rat१३p१.jpg-
८८७३६
रत्नागिरी - महर्षी कर्वे कॉलेजच्या विद्यार्थिनी रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या मदतीने रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत केविंगचा थरार अनुभवला.
--

महर्षी कर्वेच्या विद्यार्थिनींनी अनुभवला केविंगचा थरार

महिला दिनाचे निमित्त ; रत्नदुर्ग माउंटेनिअर्सकडून आयोजन

रत्नागिरी, ता. १३ ः शिरगाव येथील महर्षी कर्वे कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी वेगळाच अनुभव घेतला. येथील रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या मदतीने रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत केविंगचा थरार ७५ विद्यार्थ्यांनी अनुभवला.
महिला दिनाचे औचित्य साधून कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी अतिशय वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय महर्षी कर्वे कॉलेजचे मंदार सावंत, तेंडुलकर, प्रिंसिपल कोतवडेकर व अन्य शिक्षकांनी घेतला. यासाठी टीम रत्नदुर्गचे अध्यक्ष विरेंद्र वणजू यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नदुर्ग टीमच्या महिला सदस्यांनी या उपक्रमाचे उत्तमरित्या नियोजन केले. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत विद्यार्थिनींना केविंगकरिता नेण्याचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमात कॉलेजच्या ७५ विद्यार्थिनींनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली. महिला दिनी गुहेतील केविंगचा थरार पार पडला. महर्षी कर्वे कॉलेजच्या विद्यार्थिनींनी न डगमगता हा साहसी उपक्रम मस्तपैकी मजेमध्ये अनुभवला. टीम रत्नदुर्गतर्फे केलेल्या नियोजनाचे व गुहेमध्ये गुहेविषयी दिलेल्या माहितीचे भरभरून कौतुक केले. हा साहसी उपक्रम अनेक रत्नागिरीकर अनुभवतच असतात; पण या वेळच्या उपक्रमाचे नियोजन महिला दिनानिमित्त टीम रत्नदुर्गच्या महिला सदस्या आदिती व आमिषा पावसकर या दोघींनी पुढाकार घेऊन उत्तमरित्या नियोजन करून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल टीम रत्नदुर्गतर्फे या महिलांचे कौतुक करण्यात आले. तसेच महर्षी कर्वेच्या विद्यार्थिनींचे शिस्तबद्ध वागण्याचे व त्यांच्या सहसाचे भरभरून कौतुक रत्नदुर्ग माउंटेनियर्सतर्फे करण्यात आले.