कोकण कृषी विद्यापिठाकडून सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण कृषी विद्यापिठाकडून सूचना
कोकण कृषी विद्यापिठाकडून सूचना

कोकण कृषी विद्यापिठाकडून सूचना

sakal_logo
By

rat१३१४.TXT

बातमी क्र.. १४ (टुडे ३ साठी)

कोकण कृषि विद्यापीठाकडून मार्गदर्शन

झाडावर आंबा टिकवून ठेवण्यासाठीचा प्रयत्न ; उष्म्याचा फटका

त्नागिरी, ता. १३ ः दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्म्याचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला आहे. यंदा जिल्ह्यात हापूसचे उत्पादन पहिल्या टप्प्यात कमी राहणार आहे. झाडावर असलेला आंबा टिकवून ठेवण्यासाठी आंबा बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. कोकण कृषी विद्यापिठाकडूनही बागायतदारांना आंबापिक वाचवण्यासाठी सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.
मुंबई वेधशाळेतून प्राप्त झालेल्या हवामान सूचनेनुसार, मार्च महिन्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे तापमानात वाढ दिसून आली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात आंबा आणि काजू हे मोहोर ते फळ पक्वतेच्या सर्व अवस्थेत आहे. हवामान अंदाजानुसार, तापमानात वाढ झाल्यामुळे आंबा फळगळ होण्याची तसेच फळे भाजण्याची, तडकण्याची शक्यता होती. तापमानवाढीचे पिकावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. आंब्याच्या झाडाला सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्यात यावे. झाडाच्या बुंध्याजवळ गवताचे आच्छादन करावे. फळांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोटी आकाराच्या टिकलेल्या आंबा फळांना कागदी पिशवी लावाव्यात तसेच फळगळ कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का द्रावणाची फवारणी करावी. वाटाणा, गोटी आणि सुपारी आकाराच्या आंबा फळांवर करण्याचा सल्ला कृषी सल्ला पत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कृषी सल्ल्यानुसार नियोजन केल्यास व सल्ल्याचा उपयोग केल्याने फळांची गळ कमी होईल. विद्यापिठाने शिफारस केलेल्या आंबाफळांना कागदी पिशव्याचे आवरण घालण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या बागेत केल्यास जास्त होईल, असे कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यात नमूद केले आहे.