आंतर को-ऑपरेटिव्ह बॅंक कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा सेंट्रल बॅंकेला अजिंक्यपद

आंतर को-ऑपरेटिव्ह बॅंक कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा सेंट्रल बॅंकेला अजिंक्यपद

rat१३१५. txt


- rat१३p८.jpg ः
८८७४३
रत्नागिरी ः आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणारा रत्नागिरी जिल्हा सेंट्रल को-ऑप. बँकेचा संघ.

कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा सेंट्रल बॅंक अजिंक्य

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे ६३व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा सेंट्रल को-ऑप. बँकेने अजिंक्यपद पटकावले. श्रमिक जीमखाना येथील अंतिम फेरीत रत्नागिरी बँकेने डीएमके जावळी सहकारी बँकेचा ३० गुणांनी मोठा पराभव केला.
मुंबईत रंगलेल्या कबड्डी स्पर्धेत नामवंत खेळाडूंनी चांगल्या खेळ केला. अंतिम लढतीत अभिजित घाणेकरच्या अष्टपैलू खेळामुळे रत्नागिरी जिल्हा सेंट्रल को-ऑप. बँकेने डीएमके जावळी सहकारी बँकेचा ३६-६ अशा गुणांनी मोठा पराभव केला. पहिल्या डावात दोन लोण देत रत्नागिरी बँकेने मध्यंतराला २७-४ असा विजयी पाया रचला होता. तत्पूर्वी उपांत्य फेरीत रत्नागिरी बँकेने महानगर बँकेवर ४०-११ असा तर जावळी बँकेने मुंबै बँकेवर ४०-२२ असा विजय मिळवला होता.
या स्पर्धतील उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार जावळी बँकेच्या ऋषिकेश चोरटेने तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार रत्नागिरी बँकेच्या अभिजित घाणेकरने पटकावला. युनियनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, प्रवीण शिंदे, भार्गव धारगळकर, प्रकाश वाघमारे, हासम धामसकर, मनोहर दरेकर, नितीन गव्हादे, समीर तुळसकर, अमोल प्रभू आणि इतर पदाधिकारी यांनी विजेत्या, उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवले. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेट्ये व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com