शिवराय जीवन जगण्याचे सर्वोच्च परिमाण

शिवराय जीवन जगण्याचे सर्वोच्च परिमाण

swt131.jpg
88757
हळदोणेः प्रा. रुपेश पाटील यांचे स्वागत करताना मान्यवर.

शिवराय जीवन जगण्याचे सर्वोच्च परिमाण
शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटीलः हळदोणेत शिवजयंतीनिमित्त व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१३ः छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर एक प्रचंड विचारशस्त्र आहेत. अखिल विश्वाला वंदनीय असणारे, प्रत्येक महाराष्ट्रवासीयाच्याच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेले जाणते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. छत्रपती शिवाजी म्हणजे केवळ नाव नाही, तर जीवन जगण्याचे एक सर्वोच्च परिमाण आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी हळदोणे (गोवा) येथील व्याख्यानात केले.
हळदोणे येथील छत्रपती शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. रुपेश पाटील यांचे शिवजयंती उत्सवानिमित्त ''शिव-शंभू आपले अखंड प्रेरणास्त्रोत'' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष गोविंद गोवेकर होते.
व्याख्यानातून प्रा. पाटील यांनी छत्रपती शिवरायांची शिवनीती तसेच गनिमी कावा आणि त्यांना देणाऱ्या, स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या निर्भीड अशा अनेक रणझुंजार वीरांच्या गाथा सांगून प्रबोधन केले. ते पुढे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज का घडले, कसे घडले, की जाणीवपूर्वक त्यांना माँसाहेब जिजाऊ यांनी घडविले, याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज जाणून घेताना प्रचंड उत्सुकता वाटली. असे असताना आजची तरुणाई केवळ डोक्यावर फेटा बांधून आणि खांद्यावर भगवा झेंडा घेऊन त्यांचा जयघोष करताना त्यांचा एक तरी विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणतात, हा संशोधनाचा विषय आहे."
यावेळी शिवजयंती उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरणही प्रा. पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गोविंद गोवेकर, जयवंत मावळणकर, अभिजीत साळगावकर, सविदास नाईक, अनिल नार्वेकर, दिलीप मालदार, सागर केरकर, गोपाळ नाईक, रामा नाईक, रुपेश नाईक, शैलेश मयेकर, अच्युत घाडी, सुदेश खलप, चिरंजीव नाईक, सुनील खाडे, राघोबा करापूरकर, शिवानंद नाईक, कल्पेश नाईक, रुपेश नाईक, बाबांनी पार्सेकर, रितेश कोठावळे, विश्वसेन च्यारी, संदीप काणेकर, गीतेश मालवणकर, सुशांत साळगावकर, पुंडलिक नायक, अमिता साळगावकर, प्रियांका साळगावकर, शाली वाघुरमेकर, रेश्मा नाईक, सोनम मयेकर, मंगल हळदणकर, वंदना नाईक, रेखा मयेकर, लक्ष्मी साळगावकर, सुजाया नायक, गेशना गोवेकर, कनिशा शिरोडकर, शम्मी नायक, श्रावणी नेमळेकर, रुद्राणी मडगावकर, स्मिता मडगावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल नार्वेकर यांनी केले. आभार सविदास नाईक यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com