रेडी-नागोळेवाडी मंदिरात 26 पासून धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडी-नागोळेवाडी मंदिरात 26 पासून धार्मिक कार्यक्रम
रेडी-नागोळेवाडी मंदिरात 26 पासून धार्मिक कार्यक्रम

रेडी-नागोळेवाडी मंदिरात 26 पासून धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

रेडी मंदिरात
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्लेः रेडी-नागोळेवाडी येथील गणपती मंदिर संप्रोक्षण कलशारोहण २६ ते २८ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त २६ ला सकाळी ८.३० गणपती पूजन, धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३५ वाजता नैवेध, दुपारी १.३० वाजता आरती, सायंकाळी ५ वाजता स्थनिकांची भजन, रात्री ७ वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा देव झाला गुराखी’ नाटक, २७ ला सकाळी ८ वाजता शांतीपाठ ८.४५ वाजता संप्रोक्षण विधी, सकाळी ९.१५ वाजता कलश संप्रोक्षण, ११.३० वाजता मुख्य होम, दुपारी १२.३५ वाजता नैवेध दुपारी १ वाजता आरती, सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री ८ वाजता नृत्य व दगडू सावधान’ होणार आहे. २८ ला सकाळी १०.३१ कलशारोहण, सकाळी ११.४५ वाजता बलिदान, पूर्णाहुती, दुपारी १२.१५ सामूदायिक गार्‍हाणे, आशीर्वाद, १२.३० नैवेध, १ वाजता आरती सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री नाटक ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा ''स्पर्शमणी’ नाटक होणार आहे. या कार्यक्रमाच्या तीन दिवस दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
----------------------
कर्मचारी महासंघाचा
संपास पाठिंबा
कणकवलीः जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांनी मिळून १४ मार्चला बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग विस्तार अधिकारी संघटना यांचा पाठिंबा असल्याची माहिती या दोन्ही संघटनांचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वारंग, जि. प. कर्मचारी महासंघाचे सचिव रामचंद्र जंगले यांनी दिली आहे. जि. प. लिपिक कर्मचारी संघानेही संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती अध्यक्षा मनीषा देसाई यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे परिचर चालक संघटनेनेही संपाला पाठिंबा दिला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, असे म्हटले आहे.
---------------------