
महिला दिनानिमित्त स्पर्धांना मळेवाड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
swt1310.jpg
88758
मळेवाडः पैठणी विजेत्या महिलेला पैठणी देऊन सन्मानित करताना प्रवीण आपटे. सोबत इतर मान्यवर. (छायाचित्र ः धनश्री मराठे)
महिला दिनानिमित्त स्पर्धांना
मळेवाड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. १३ः ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरेतर्फे आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्त येथील सुदर्शन सभागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचा शुभारंभ तळवडे येथील डॉ. नेहा कांडरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, तात्या मुळीक, सानिका शेवडे, प्रवीणा आपटे, ग्राम संघाचे पदाधिकारी, सीआरपी व गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी पाककला, हळदी कुंकू, खेळ पैठणीचा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेंचा अनुक्रमे निकाल असाः खेळ पैठणीचा- ऋतुजा मोरजकर, तेजश्री पेडणेकर, श्वेता रेडकर. पाककला स्पर्धा ः समिधा राऊत, अँनी फर्नांडिस,
श्रीमती सुवर्ण सातार्डेकर, सीमा कुंभार. संगीत खुर्ची (महिला) - इंद्रावती केरकर, प्राची मुळीक. संगीत खुर्ची (मुली)-मंदा नाईक, लतिका काळोजी. लिंबू चमचा ः रश्मी नाईक. विजेत्यांना ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे, प्रवीण आपटे, जानकी शिरसाट, प्राची मुळीक, वैष्णवी मुळीक, ईशा काळोजी यांच्या शुभ हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले. कार्यक्रमासाठी विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉल मालक प्रशांत आपटे यांचे ग्रामपंचायतकडून आभार मानण्यात आले.