यशस्वी विवाहासाठी हवे समुपदेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशस्वी विवाहासाठी हवे समुपदेशन
यशस्वी विवाहासाठी हवे समुपदेशन

यशस्वी विवाहासाठी हवे समुपदेशन

sakal_logo
By

swt132.jpg
88761
सावंतवाडी ः मराठा वधू-वर सूचक मेळाव्यात मार्गदर्शन करताना अर्चना घारे-परब. सोबत अॅड. सुहास सावंत व अन्य.

यशस्वी विवाहासाठी हवे समुपदेशन
अॅड. सुहास सावंतः सावंतवाडीत मराठा वधू-वर सूचक मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१३ः लग्न जुळवाजुळव करताना भावनांचा विचार न करता भौतिक सुविधांचा उहापोह केला जातो. त्यामुळे लग्नाच्या स्वप्नांना तडा जाण्याची शक्यता असते. अखिल भारतीय मराठा महासंघ वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून समुपदेशन करून लग्नाची यशस्वी गाठ बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा विश्वास अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथे वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी अॅड. सावंत बोलत होते. व्यासपीठावर अर्चना फाउंडेशन अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे, दोडामार्गचे उदय पास्ते, वेंगुर्लेचे मनोहर येरम, अभिमन्यू लोंढे, जिल्हा कार्यालय प्रमुख रवींद्र राऊळ, पुंडलिक दळवी, पूजा दळवी, धोंडी दळवी, संग्राम सावंत आदी उपस्थित होते. अर्चना घारे-परब यांनी, मराठा समाजासाठी प्रेरणादायी योगदान दिले जात आहे. नोकऱ्या नाहीत; पण लग्न जुळवाजुळव करताना भौतिक मागण्या वाढत आहेत. अॅड. सावंत प्रेरणादायी योगदान देत आहेत. आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर सुरू केले आहे. या कार्यालयातून देखील सेवा दिली जात आहे, असे सांगत सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
अॅड. सावंत म्हणाले, "मराठा समाजाचे काम करताना समाजातील विविध समस्या येऊ लागल्या. त्यात लग्न विषय आला. त्यामुळे वधू-वर सूचक मंडळ करण्याची संकल्पना मांडली. लग्न जुळताना योग्य चौकशी न केल्यास स्वप्नभंग होऊ शकतो. त्यामुळे वधू-वर सूचक मेळावा आयोजित करून नोंद करून योग्य स्थळ शोधले जाईल. लग्न जुळवाजुळव करताना चुकीच्या आशादायी प्रयत्नांमुळे अडचणी येतात. त्यासाठी विवाह समुपदेशन केले जाईल. त्यामुळे कुरबुरी होणार नाहीत. लग्न जुळवाजुळव करताना भौतिक सुविधांबाबत पाहिले जाते. जोडीदार निवडताना भौतिक सुविधांबाबत विचार करू नये. मराठा उद्योजक यादी बनवून समाजासाठी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. आर्थिक विकास महामंडळ योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जातो. याशिवाय करिअर मेळावा घेण्यात येणार आहे."
सीताराम गावडे यांनी समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. समाजातील समस्या ऐकून त्यावर उपाय शोधण्यासाठी गावागावांत जाऊन ''गाव तेथे मराठा समाज शाखा'' निर्माण होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. लग्न जुळवाजुळव करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. समाजातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे सांगितले.
जिल्हा कार्यालय प्रमुख रवींद्र राऊळ यांनी वधू-वर सूचक मेळाव्याबाबत माहिती दिली. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तर अॅड. सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कुडाळ आणि सावंतवाडी येथे सुमारे १५० वधू-वर सूचक नोंदणी झाल्याचे रवींद्र राऊळ यांनी सांगितले.