अॅथलेटिक्समध्ये श्रेयस, सय्यद, दीपांशूला पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अॅथलेटिक्समध्ये श्रेयस, सय्यद, दीपांशूला पदके
अॅथलेटिक्समध्ये श्रेयस, सय्यद, दीपांशूला पदके

अॅथलेटिक्समध्ये श्रेयस, सय्यद, दीपांशूला पदके

sakal_logo
By

rat१३२३.TXT

- rat१३p१७.jpg-
८८७५५
डेरवण ः एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलात धावण्याच्या स्पर्धेत सहभागी खेळाडू.

अॅथलेटिक्समध्ये श्रेयस, सय्यद, दीपांशूला पदके

डेरवण यूथ गेम्स ः कोल्हापूर, सांगली, सातारचे वर्चस्व

खेड, ता. १३ ः एसव्हीजेसीटीतर्फे आयोजित डेरवण यूथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवातील अॅथलेटिक्समध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची लयलूट केली. ४०० मीटर धावण्यात १६ वर्षांखालील मुलांमध्ये डेरवणच्या श्रेयस ओकाटेने कांस्य, १४ वर्षांखालील मुली गटात रत्नागिरीच्या होमेरा सय्यदने कांस्य तर लांब उडीत मंडणगडच्या दीपांशू भुवडने रौप्य पदक पटकावत चांगली कामगिरी केली.
डेरवण (चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘डीवायजी २३’हा क्रीडा महोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. क्रीडाप्रेमी यातील विविध क्रीडाप्रकारांतील स्पर्धांना गर्दी करत खेळांचा आनंद लुटत आहेत. अॅथलेटिक्समधील विविध विजेत्यांना माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश बोडके, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर सुतार, दिलीप गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. उंच उडी प्रकारांत कोल्हापूरच्या अॅथलिट्सनी सहा पदके जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात तीनही पदके आणि १४ वर्षांखालील गटात दोन तर १४ वर्षांखालील मुली या गटातील एक अशी एकूण ६ पदके कोल्हापूरच्या अॅथलिट्सनी खिशात घातली. धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये सातारा येथील ७ अॅथलिट्सनी, सांगली येथील ५ आणि कोल्हापूरच्या ३ अॅथलिट्सनी पदकांवर आपली नावे कोरली.
--