जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची संस्थेला भेट

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची संस्थेला भेट

rat१३२६. txt


जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची गुरूप्रसाद संस्थेला भेट

रत्नागिरी ः एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्यांवर काम करणाऱ्या येथील गुरूप्रसाद संस्थेला जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी उच्च माध्यमिक परीक्षा दिलेल्या व निराधार असलेल्या मुलींना मदत केली. त्या दोन्ही मुलींना एमएसीआयटी आणि टायपिंगचा कोर्स करायचा असल्याने त्याच्या फी एवढी रक्कम त्यांना सुपूर्द केली. त्यांनी सरकारी नोकरीत अनेक लोकांना मदत दिली; परंतु एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या महिलांना मी मदत करू शकते, हे मला गुरूप्रसादच्या संपर्कात आल्यानंतरच कळले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहताना जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गुरूप्रसादच्या क्लाएंट अंत्योदय अन्न योजनेसंबंधाने ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यास त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
--

कबड्डी स्पर्धेत स्वराज्य विजेता

गुहागर ः डेरवण येथे झालेल्या युथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुली या गटात चिपळूणच्या स्वराज्य स्पोर्ट्स ॲकॅडमीने उपांत्य फेरीत रबाळे (ठाणे) या संघावर मात करून अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात गतवर्षीचा विजेता तसेच एक बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरूड, पुणे या संघावर एकतर्फी विजय मिळवून अंतिम विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले. संपूर्ण स्पर्धेत तसेच अंतिम सामन्यातदेखील श्रीया हुंबरे, मुग्धा शिर्के यांनी दिमाखदार खेळ केला. या विजयानंतर सर्व खेळाडूंवर तसेच स्वराज्य स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या नवनिर्वाचित कमिटीच्या अध्यक्षा श्रद्धा हुंबरे, उपाध्यक्षा व खजिनदार राखी सकपाळ, सेक्रेटरी अंकिता पवार व सर्व सदस्य यांच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.
--

फोटो ओळी
-rat१३p१९.jpg-
८८७७०
चैतन्य परब
-
गोविंदराव गुणे ख्याल गायन स्पर्धेत चैतन्य परबचे यश

रत्नागिरी ः येथील गायन समाज देवल क्लबतर्फे आयोजित गोविंदराव गुणे स्मृति हिंदूस्थानी ख्याल गायन स्पर्धेत रत्नागिरीच्या चैतन्य परब याने दुसरा कमांक पटकावला. ही स्पर्धा कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब सभागृहात रंगली. सविस्तर निकाल असा ः आकाश पंडित (प्रथम), केतकी घारपुरे (तृतीय), उत्तेजनार्थ वैष्णवी जोशी, श्रीहरी कुलकर्णी, निकेता लेले, मुक्ता मिसर.
चैतन्यने स्पर्धेत बिलासखानी तोडी रागातील बडा व छोटा ख्याल सादर केला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चैतन्यचे संगीताचे सुरवातीचे शिक्षण आई विनया परब यांच्याकडे झाले. सध्या तो किराणा घराण्याचे नामवंत गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे तालीम घेत आहे. या स्पर्धेत यापूर्वी मंजिरी असनारे, विश्वजीत बोरवणकर, पुष्कर लेले, रमाकांत गायकवाड, देवश्री नवघरे, पूजा बाक्रे, प्राजक्ता मराठे या नामवंत गायकांनी प्रथम कमांक पटकावला आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com