देश घडविण्याची महिलांमध्ये क्षमता

देश घडविण्याची महिलांमध्ये क्षमता

८८७६०


देश घडविण्याची महिलांमध्ये क्षमता
सुबोधिनी परब; आंबडोसमध्ये महिलादिनी विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केल्यास महिलांना स्वावलंबनासह सन्मानही प्राप्त होईल. स्वतःच्या कुटुंबासह देशही प्रगतीपथावर नेण्याची क्षमता आजच्या स्त्रीमध्ये आहे, असे मत आंबडोस गावच्या सरपंच सुबोधिनी परब यांनी व्यक्त केले. त्या आंबडोस ग्रामपंचायत आयोजित महिला दिनाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होत्या.
आंबडोस ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त २७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांच्या सांगता कार्यक्रमात व्यासपीठावर आंबडोस गावच्या माजी सरपंच राधा वरवडेकर, ग्रामपंचायत सदस्या आदिती परब, श्रद्धा परब, सतीश दळवी, सुलभा परब, आंबडोस-व्हाळवाडीच्या मुख्याध्यापिका रुपाली कुबल, आशा सेविका प्रणाली चव्हाण, शीतल कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा आंबडोस-व्हाळवाडीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचे गौरव गीत म्हटले.
महिला व शालेय विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अठरा वर्षे पुढील खुला गट अशा चार गटात स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात आली. यातील खुल्या गटात तेजस्विनी कदम, ऋतुजा बुटे, राखी राणे, सुगंधा नाईक, पूजा परब, माध्यमिक गटात मिताली परब, पूजा दळवी, उच्च माध्यमिक गटात स्नेहल परब, वैष्णवी परब, प्राथमिक गटात जान्हवी भोसले, काव्या चव्हाण, ईश्वरी परब, धनश्री साळगावकर यांनी क्रमांक मिळविले. या यशस्वी स्पर्धकांसह आंबडोस नंबर १, शाळा आंबडोस कदमवाडी व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रभात फेरी काढून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


कर्तृत्ववान महिलांचा
पुरस्काराने गौरव
यानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक वाडीतील एका महिलेला सन्मानाने गौरविण्यात आले. यामध्ये प्रतिभा चव्हाण (व्हाळवाडी), सुमती परब (कदमवाडी), साक्षी परब (महात्मा फुले नगर), पूजा कदम (देऊळ मागचीवाडी), नीलम नाईक (परबवाडी), दीपलक्ष्मी परब (टेंबवाडी), लक्ष्मी नाईक (गावठाणवाडी), अंकिता बुटे (धनगरवाडी) या महिलांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com