ओटवणेतील शिमगोत्सवाची घोडेमोडणीने उत्साहात सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओटवणेतील शिमगोत्सवाची घोडेमोडणीने उत्साहात सांगता
ओटवणेतील शिमगोत्सवाची घोडेमोडणीने उत्साहात सांगता

ओटवणेतील शिमगोत्सवाची घोडेमोडणीने उत्साहात सांगता

sakal_logo
By

swt1313.jpg
88772
ओटवणेः येथील शिमगोत्सवानिमित्त रंगपंचमी साजरी करताना ग्रामस्थ.

ओटवणेतील शिमगोत्सवाची
घोडेमोडणीने उत्साहात सांगता
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १३ः येथील शिमगोत्सवाची काल (ता. १२) घोडेमोडणीने सांगता झाली. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात गावातील तसेच जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. गावातील मांडावरील शेरवाळेवाडी, गवळीवाडी, करमळगाळू, मांडवफातरवाडी, कापईवाडी येथील रोंबाटे मोठ्या उत्साहाने नाचतगाजत व रंगांची उधळण करत गाव चव्हाट्यावर हजर झाली. ही सर्व रोंबाटे कुळघराकडे पोहोचल्यानंतर सगळ्या रोंबाटांचा एकत्र जल्लोष पाहायला मिळाला.
त्यानंतर दैविक निशाण काठीसह गावठाणच्या मुख्य रोंबाटाने ढोलताशांच्या वाद्यात नाचत कुळघर ते गाव चव्हाटा अशी फेरी पूर्ण केली. यावेळी सर्वांनीच वाद्याच्या ठेक्यावर फेर धरला. रंगांची चौफेर उधळण करण्यात आली. हे मुख्य रोंबाट होळीकडे आल्यानंतर गाव होळीला पाच प्रदक्षिणा घालून गावाकौलाने रंगपंचमीची सांगता झाली. यावेळी होळीला नारळ अर्पण करून भाविकांनी नवसफेड केली. तसेच नवे नवस बोलण्यात आले. रात्री दैविक कळसाच्या आगमनाने भजन कीर्तनात भाविक रंगून गेले.