वेशभूषा स्पर्धेत वाईरकर, भोगटे प्रथम

वेशभूषा स्पर्धेत वाईरकर, भोगटे प्रथम

swt1314.jpg व swt1315.jpg
88773, 88774
कट्टा ः वेशभूषा स्पर्धेत प्रथम आलेल्या बेवड्याच्या भूमिकेतील प्रियांका वाईरकर आणि कोकण रेल्वेतील चहा वाल्याच्या भूमिकेतील प्रियांका भोगटे.

वेशभूषा स्पर्धेत वाईरकर, भोगटे प्रथम
कट्टा येथील स्पर्धाः बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ः बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत प्रियांका वाईरकर आणि प्रियांका भोगटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कट्टा परिसरातल 26 महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे परिक्षण नितीन वाळके व सायली चव्हाण यांनी केले. वाईरकर यांनी सादर केलेला बेवडा व प्रियांका भोगटे यांनी सादर केलेला कोकण रेल्वेतील चहावाला यांना प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक वैदेही वराडकर (सावित्रीबाई), अनुश्री आळवे (जीजाऊ), तृतीय क्रमांक शुभदा वेंगुर्लेकर (हिरकणी), निव्या कुणकवळेकर (बेवडा), सानवी मसूरकर (हिरकणी), चतुर्थ क्रमांक पूर्वा मोरजकर (शाळकरी मुलगी), प्रिती महाभोज (श्रावणबाळ), उत्तेजनार्थ उज्वला (गाडगेबाबा), पूजा सावंत (काश्मीर की कळी), लिना शिंदे (कोकणी बाई) यांनी यांनी स्पर्धेत बाजी मारली.
या स्पर्धेत विजया वराडकर (किर्तनकार), दीक्षा रेवडेकर (झाशीची राणी), जागृती आंबेरकर (मिस इंडिया), अर्चना धुत्रे (मासेवाली), दिवीशा गुराम (जिजाऊ), स्वाती पोखरणकर (सावित्रीबाई), नूतन मोरजकर (जिजाऊ), सायली बोड्ये (दयाभाभी), हर्षदा चव्हाण (जिजाऊ), मधुरा मोरजकर (नवरी), दक्षता पाडावे (जनाबाई), श्वेता गावडे (वारकरी) आणि उज्वला गुराम यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे सर्व नियोजन सुजाता पावसकर व शिवण क्लासच्या मुलीनी केले होते. बक्षीस वितरण अॅड समृद्धी म्हाडगुत, सायली चव्हाण, नितीन वाळके, हरेश चव्हाण, बापू तळावडेकर, लक्ष्मीकात खोबरेकर, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, वैष्णवी लाड, बाळकृष्ण नांदोसकर, गीता नाईक, सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com