-चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम वेगाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम वेगाने
-चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम वेगाने

-चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम वेगाने

sakal_logo
By

rat१३१७.txt


फोटो ओळी
- ratchl१३१.jpg ः
88791
चिपळूण ः महामार्गावरील उड्डाणपुलावर अत्याधुनिक यंत्रणेने गर्डर उभारणीसाठी सुरू झालेले काम.
--

चिपळुणात सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचे काम वेगाने

४६ पिलर पूर्ण ; ८०० गर्डर बसविण्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वाधिक लांबीच्या (१. ८० किमी) उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे. या पुलाच्या ४६ पिलरचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने ठेकेदार कंपनीने त्यावरील गर्डरच्या कामाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी क्रेन व अन्य यंत्रणा उभारण्याची तयारी बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलाच्या बाजूने सुरू केली आहे. येत्या १५ दिवसात गर्डर टाकण्याच्या कामास सुरवात होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
गेल्या दोन महिन्यापांसून महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाला चांगलीच गती आली आहे. परशुराम ते आरवलीदरम्यानच्या कामाचा वेग वाढला आहे; मात्र अजूनही काही भागात मोऱ्या व गटारे उभारण्याची कामे सुरू आहेत. सुमारे ३६ किलोमीटरच्या अंतरातील हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. कापसाळ भागातील काँक्रिटीकरणानेही वेग घेतला. त्याशिवाय रखडेलल्या सावर्डे बाजारपेठ परिसरातही एकेरी मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. चिपळूण शहर हद्दीतही उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. त्यातील एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्णत्वास जात आहे.
सद्यःस्थितीत ठेकेदार कंपनीने सर्वात लांब पल्ल्याच्या उड्डाणपुलाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पुढेपर्यंत हा पूल उभारला जाणार आहे. साधारण या पुलाची लांबी १८४० मीटर तर रुंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे काम एकाचवेळी चार ठिकाणी सुरू केल्याने ४६ पिलरचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. त्यानंतर आता सर्व्हिस रोडसह गर्डरच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे.
गर्डरच्या कामासाठी अत्यावश्यक असलेली महाकाय यंत्रणा बहादूरशेखनाका येथे दाखल केली आहे. या यंत्रणेचे जोडकाम पुढील सुमारे १५ दिवस चालणार आहे. त्यानंतर गर्डर बसवण्याच्या कामाला सुरवात होणार आहे. सुमारे ८०० गर्डर या पुलावर बसवले जाणार आहेत. पिलर उभारताना प्रत्येक ठिकाणी खड्डे व काही ठिकाणी भराव करण्यात आला होता; मात्र आता गर्डरच्या कामासाठी पिलरच्या आजूबाजूने सपाटीकरण केले जात आहे. सावर्डे कोडमळा येथे तयार स्थितीत असलेले हे गर्डर येथे आणून क्रेनच्या साहाय्याने बसवले जाणार असल्याची माहिती ठेकेदार कंपनीकडून देण्यात आली.