लिपिक संघटनेचा आज मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिपिक संघटनेचा आज मोर्चा
लिपिक संघटनेचा आज मोर्चा

लिपिक संघटनेचा आज मोर्चा

sakal_logo
By

swt१३१७.jpg
८८७८६
सिंधुदुर्गनगरीः येथे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना निवेदन सादर करताना जिल्हा परिषद लिपिक संघटना.

लिपिक संघटनेचा आज मोर्चा
सीईओंना निवेदनः जुन्या पेन्शनसह प्रमुख मागण्यांसाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः जुनी पेन्शन सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यानी उद्यापासून (ता.१४) बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद लिपिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना निवेदन सादर केले आहे. जिल्ह्यातील विविध ५६ विभागातील १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.
येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात बैठक घेऊन राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने उद्याच्या संपाबाबत नियोजन केले आहे. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका आणि नगर परिषद कर्मचारी, जिल्हा महसूल कर्मचारी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा नर्सेस फेडरेशन, राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या सर्व संघटना या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याने ऐंन मार्चअखेर निधी खर्चावर व विकास कामांवर याचा परिणाम दिसून येणार आहे.
--------
चौकट
या आहेत मागण्या
पीएफआरडी एफ कायदा रद्द करा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा
रिक्त पदे तात्काळ भरा
आठवा वेतन आयोग स्थापन करा
चतुर्थ श्रेणी कर्मचारी रिक्त पदे तात्काळ भरा
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करा
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा
खाजगीकरण आणि कंत्राटीकरण धोरण रद्द करा
-----------
चौकट
असा असेल मोर्चा
ओरोस रवळनाथ मंदिर येथून उद्या भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शिस्तबद्ध व नियोजनबद्ध हा मोर्चा असणार असून शांततेत, नियम पाळत हा मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याने हा ऐतिहासिक मोर्चा असेल, असे राजन कोरगावकर यांनी सांगितले.
---------