प्रा. प्रवीण बांदेकर यांना ''साहित्य अकादमी'' प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. प्रवीण बांदेकर यांना ''साहित्य अकादमी'' प्रदान
प्रा. प्रवीण बांदेकर यांना ''साहित्य अकादमी'' प्रदान

प्रा. प्रवीण बांदेकर यांना ''साहित्य अकादमी'' प्रदान

sakal_logo
By

swt१३१६.jpg
८८७८५
नवी दिल्ली : मराठीतील कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करताना अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक व अन्य.

प्रा. प्रवीण बांदेकर यांना
‘साहित्य अकादमी’ प्रदान
सावंतवाडी, ता. १३ः साहित्य अकादमीतर्फे मराठी भाषेतील साहित्यकृतीसाठी २०२२ चा साहित्य अकादमी पुरस्कार येथील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांना शनिवारी (ता. ११) प्रदान करण्यात आला. देशभरातील एकूण २४ भाषा प्रकारातील साहित्यिकांना यावेळी गौरविण्यात आले. ''उजव्या सोंडेच्या बाहुल्या'' या कादंबरीसाठी प्रा. बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. साहित्य अकादमीचे नूतन अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्षा कुमुद शर्मा, सचिव के. श्रीनिवास राव, प्रख्यात इंग्रजी लेखक उपमन्यू चॅटर्जी आदी उपस्थित होते. प्रा. बांदेकर यांच्या चाळेगत, उजव्या सोडेंच्या बाहुल्या, इंडियन अॅनिमल फार्म या कादंबऱ्या, येरु म्हणे, खंडोबाच्या नावाने, चीनमिन हे कवितासंग्रह, तर घुंगुरकाठी हा ललितलेख संग्रह प्रसिद्ध आहे. कोकणातील सर्व लिहित्या हातांना हा पुरस्कार अपर्ण करत असल्याचे त्यांनी पुरस्कार वितरणानंतर सांगितले.
प्रा. बांदेकर यांना अलीकडेच येथील भवरलाल जैन फाउंडेशनतर्फे ना. धो. महानोर उत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. प्रा. बांदेकर हे सावंतवाडी-सिंधुदुर्ग येथील आरपीडी ज्युनिअर कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या माध्यमातून ते साहित्य चळवळीत सक्रिय आहेत.