गुहागर ः गुहागरचा विकास आराखडा रद्द करा

गुहागर ः गुहागरचा विकास आराखडा रद्द करा

फोटो ओळी
-rat१३p२६.jpg ःKOP२३L८८७९२
गुहागर ः येथील जनतेच्या मागणीचे निवेदन सामंत यांना देताना भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते.


गुहागरचा विकास आराखडा रद्द करा
शहर नागरिक मंचाची मागणी; उद्योगमंत्री उदय सामंतांना निवेदन
गुहागर, ता. १३ ः विकासाच्या नावाखाली स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करावा, असे निवेदन आज उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. या निवेदनावर गुहागर शहरातील नागरिकांच्या सह्या आहेत. गुहागर शहरातील सर्व नागरिकांची सभा भंडारी भवनमध्ये झाली. या सभेत तसा ठराव करण्यात आला होता.
शहरातील नागरिकांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत, हे समजून घेण्यासाठी भंडारी भवन येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेला राजकीय रंग चढू नये, म्हणून गुहागर शहर नागरिक मंचची तात्पुरती स्थापना करण्यात आली. यामध्ये अनेक नागरिकांनी विकास आराखड्याविरोधात मते मांडली. स्थानिकांची घरे उद्ध्वस्त करून गुहागरचा विकास कसा होणार, दुपदरी महामार्गापेक्षा मोठे, १२ व १८ मिटरचे रस्ते गल्लीबोळ दाखवले म्हणजे विकास होतो का? समुद्रावरून जाणारा रस्ता लोकांचे नारळमाड तोडूनच का दाखवण्यात आला? शासकीय जमिनीवर हे आरक्षण का टाकले गेले नाही? सीआरझेडच्या २०० मीटर कक्षेत आजही नारळ माड असलेले क्षेत्र निवासी आणि खरोखरच घरे असलेले क्षेत्र हरित क्षेत्र म्हणून दाखवण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न या सभेत नागरिकांनी उपस्थित केले. त्यानंतर गुहागर शहर उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करावा, असा ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावावर नागरिकांनी सह्या केल्या.
शहरातील भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत उद्योगमंत्री सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी पोचले. यामध्ये भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, गुहागर शहराध्यक्ष संगम मोरे, भाजयुमोचे हेमंत बारटक्के, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, नीलेश मोरे, अमरदीप परचुरे आदींचा समावेश होता. त्यांनी सामंत यांची भेट घेऊन गुहागरमधील जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या व नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन सामंत यांना दिले.

चौकट

सामंतांनी दिले आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने या खात्याचा प्रभारी मी आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना गुहागरमधील जनतेच्या भावना सांगेन. तसेच या निवेदनाबरोबर गुहागरचा विकास आराखडा रद्द करण्याचे पत्रही त्यांना देईन, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com