
फोटोसंक्षिप्त-''शिवगर्जना''स उपस्थितीचे केंद्रीय मंत्री ठाकूरांना निमंत्रण
८८७९९
''शिवगर्जना''स उपस्थितीचे
केंद्रीय मंत्री ठाकूरांना निमंत्रण
कुडाळ ः विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता.१७) होणाऱ्या शिवगर्जना या नाट्यप्रयोगाची तयारी कुडाळ डेपोच्या मैदानावर जोरदार सुरू आहे. या महानाट्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विशाल परब यांनी दिले असून उपस्थित राहण्याचे मंत्री ठाकूर यांनी मान्य केले आहे. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा नाट्य सोहळा होणार आहे. भाजप सिंधुदुर्ग आणि विशाल सेवां फाउंडेशनतर्फे या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. या नाट्यप्रयोगाचा कोकणातला हा पहिला प्रयोग आहे. यात सातशे कलाकार सहभागी होणार आहेत.
बांद्यात १६ ला
आरोग्य तपासणी
बांदा ः बांदा-पत्रादेवी जुना रोड येथील मातृत्व मेडिकलमध्ये गुरुवारी (ता.१६) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. गोवा-बांबुळी हॉस्पिटलमध्ये सेवा बजावलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दत्ताराम गवस मोफत तपासणीसाठी उपलब्ध होत आहेत. बांदा दशक्रोशीतील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मातृत्व मेडिकलचे मालक विराज परब यांनी केले आहे. शिबिरात गरोदर स्त्री तपासणी, व्यंधत्व, स्त्री रोग तपासणी, मासिक पाळीचे आजार, गर्भ पिशवीचे आजार, डॉक्टरांचा सल्ला तसेच मार्गदर्शन समुपदेश, इतर आरोग्य तपासणी, शुगर तपासणी मोफत करण्यात येणार आहे. रक्त तपासणी आवश्यक असल्यास आस्था क्लीनिकल लॅब मार्फत खास सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहे. महिलांनी याचा लाभ घेत आरोग्य सुदृढ बनवावे, असे आवाहन विराज परब यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी विराज परब, निलेश मोरजकर, राकेश परब, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक यांच्याशी संपर्क साधावा.