
आरोग्य तपासणी शिबिरास माड्याचीवाडी येथे प्रतिसाद
८८८१४
आरोग्य तपासणी शिबिरास
माड्याचीवाडी येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः जिव्हाळा सेवाश्रमात वृद्धांची सेवा करण्यासाठी बिर्जे परिवाराने घेतलेला वसा समाजाला प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन डॉ. संजीव आकेरकर यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी (रायवाडी) व बॅ. नाथ पै फिजिओथेरेपी व नर्सिंग महाविद्यालय, एमआयडीसी कुडाळ तसेच आरोग्यम् फिजिओथेरपी सेंटर व युवा फोरम कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी (रायवाडी) येथे करण्यात आले. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर डॉ. संजीव आकेरकर, डॉ. हर्ष सागावकर, डॉ. सूरज शुक्ला, डॉ. चैताली प्रभू, डॉ. प्रगती शेटकर, डॉ. शरावती शेट्टी, डॉ. गद्रे (नेत्र विशारद), डॉ. श्रीवदन आरोसकर, डॉ. सूरज शुक्ला, डॉ. चैताली प्रभू, उमेश गाळवणकर, बॅ. ना. पै नर्सिंग कॉलेज विद्यार्थी कल्पना भंडारी तसेच संस्थाध्यक्ष सुरेश बिर्जे, विष्णू खोबरेकर, संतोष सांगळे, श्रेया बिर्जे, साक्षी बिर्जे, राजू बिर्जे, गीतांजली बिर्जे, आर्या बिर्जे, जयप्रकाश प्रभू, संजय बिर्जे, परिसरातील लाभार्थी तसेच इतर स्टाफ उपस्थित होता. डॉ. आकेरकर यांनी जिव्हाळा सेवाश्रमात मानवतेची सेवा होत आहे. नावातच जिव्हाळा असल्याने सर्वांपोटी लावलेला जिव्हाळा दिसून आला, असे सांगितले. शिबिरांतर्गत मोफत रक्तदाब मधुमेह, फिजिओथेरेपीई, सी.जी. सर्व प्रकारची दुखणी, नेत्र तपासणी (कॉम्प्युटरद्वारे) आदी तपासण्या करण्यात आल्या.