अनुष्का कांदळगावकर नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुष्का कांदळगावकर नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम
अनुष्का कांदळगावकर नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम

अनुष्का कांदळगावकर नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम

sakal_logo
By

swt1324.jpg
L88816
मोर्वे ः येथील खुल्या नृत्य स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.

अनुष्का कांदळगावकर नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ः तालुक्यातील मोर्वे येथील श्री देव चव्हाटेश्वर शिमगोत्सव मंडळाच्यावतीने शिमगोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या खुल्या नृत्य स्पर्धेत अनुष्का कांदळगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दिया गावकर व काजल धावडे यांना अनुक्रने द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेत २० स्पर्धक सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून सुप्रिया ढोके, सुमित ढोके यांनी काम पाहिले. स्पर्धेदरम्यान घनःशाम गावकर, विठ्ठल तावडे, रत्नाकर मोर्वेकर, प्रणव धुरत, आदित्य नार्वेकर, राजाराम टिकम आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर कृष्णा ढोके, कंकाद्रित लोणे, भाग्यवान बापर्डेकर, गोविंद गावकर, सत्यवान कांदळगावकर, गणपत धुरत, सुहास कोळबकर, दत्तात्रय टिकम, राजन लोणे आदी उपस्थित होते. निवेदन घनःशाम गावकर, अरविंद मोर्वेकर यांनी केले.