रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत
रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत

रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत

sakal_logo
By

kan132.jpg
88821
कणकवलीः सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करताना सतीश सावंत आणि शिवसेना पदाधिकारी.
-----------
रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत
सतीश सावंतः कार्यकारी अभियंत्यांशी शिवसेना शिष्टमंडळांने घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ः देवगड वैभववाडीसह कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची किंवा निर्मितीची कामे दर्जेदार न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. कुणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता आणि ठेकेदाराला पाठीशी न घालता जनतेला अपेक्षित असलेले रस्ते तयार करा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आज येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये कार्यकारी अभियंत्यां श्री. सर्वगोड यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट ठेकेदारांची नावे या शिष्टमंडळासमोर उघड केली. तसेच ज्या ज्या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. त्यांची यादी आपणाकडे दिली जाईल असेही सांगितले.
कणकवली ते नागवे करंजे मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या कामावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. या कामांमध्ये दर्जेदारपणा न आल्यास आम्ही गप्प बसणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा बँकेचे संचालक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, अॅड. हर्षद गावडे. अनुप वारंग, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, युवासेनेचे मंगेश लोके उपस्थित होते.
नाटळ मल्हारीपुलावर सहा कोटीचा पुल बांधण्यात आला. तेथे संरक्षण भिंतीचे काम केले जात असल्याचा आरोप प्रथमेश सावंत यांनी केला. यावर श्री. सर्वगोड यांनी खुलासा करत, तेथील जमीन मालकांनी जेव्हा पर्यायी रस्ता देण्याचे मान्य केले होते. त्यावेळी सार्वजनिक विभागाने त्यांना संरक्षण भिंत बांधुन देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून, संरक्षण भिंत घातली जात असल्याचे सांगितले. दिगवळे येथील रस्त्यावर गेल्या वर्षभरामध्ये कार्पेट झाले नाही. याचे कारण काय असे विचारतात श्री. सर्वगोड यांनी सांगितले की, ज्या ठेकेदारांनी अर्धवट कामे सोडली, अशा काही ठेकेदारांना निलंबित केले आहे. तर काहींची मान्यता वर्षभरासाठी निलंबित केल्याचे सांगितले तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर त्या निलंबित ठेकेदारांची नावे ही श्री. सर्वगोड यांनी उघड केली. तसेच कणकवली ते कनेडी या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी झाले. मात्र, या रस्त्यावर आता जागोजागी खड्डे पडले आहेत. येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचे खड्डे न बुजवल्यास आंदोलन छेडू असा इशारा बेनी डिसोजा यांनी दिला. यावर तात्काळ निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

चौकट
भिरवंडे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणार
वृद्धाश्रम येथील गणेश मंदिरापासून भिरवंडे रामेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचा ठेका निश्चित करून काम करण्याचा आदेश लेखी स्वरूपात देण्यात आला आहे. परंतु, ठेकेदाराने ते अद्याप काम केलेले नाही. येत्या चार दिवसात या कामाला सुरुवात करून घेतली जाईल असे आश्वासन श्री. सर्वगोड यांनी दिले आहे. या रस्त्यासाठी नियोजन मधून ३० लाखाचा निधी मंजूर केला आहे. परंतु, या रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास आम्ही तुम्हाला जाब विचारणार असे सतीश सावंत यांनी सांगितले.