''गार्‍हाणा'' काव्यसंग्रहाचे जामसंडे येथे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''गार्‍हाणा'' काव्यसंग्रहाचे
जामसंडे येथे प्रकाशन
''गार्‍हाणा'' काव्यसंग्रहाचे जामसंडे येथे प्रकाशन

''गार्‍हाणा'' काव्यसंग्रहाचे जामसंडे येथे प्रकाशन

sakal_logo
By

८८८२२

''गार्‍हाणा'' काव्यसंग्रहाचे
जामसंडे येथे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः तालुक्यातील गिर्ये-बांदेवाडी येथील दिगंबर गावकर यांच्या ''गार्‍हाणा'' या मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये करण्यात आले.
यावेळी मंचावर अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, पडेल येथील श्रीराम विद्यामंदिरचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, गाबीत समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, देवगड-जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू, डॉ. रघुनाथ पोकळे, लक्ष्मण गावकर, प्रभाकर गावकर, वृषाली गावकर आदी उपस्थित होते. परशुराम उपरकर यांनी कवितासंग्रहाची प्रशंसा केली. श्री. तानवडे यांनी कविता संग्रहातील अनेक कविता मनातल्या प्रत्येक गार्‍हाण्याची आठवण करून देतात, असे सांगितले. चंद्रशेखर उपरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. गावकर यांच्या ''इपळाक'' कादंबरीला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा प्रथम पुरस्कार तसेच ''वकाद'' व ''अमुक्ती'' या कथासंग्रहाना कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे ''भस्मासुराचा वध'' हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले. याशिवाय दर्यावर्दी, माझी सहेली, दैवज्ञ अशा कथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध पत्रातून सुद्धा लेखन केले आहे. या व्यतिरिक्त गावकर यांनी २००२ ते २००४ या काळात केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर चित्रपट परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सूत्रसंचालन राकेश गावकर यांनी केले. महाराष्ट्र गाबीत संस्थेचे अध्यक्ष सुजय धूरत, शामसुंदर गावकर, राजेंद्र राजम, लक्ष्मण तारी, गणपत बांदकर, अनंत माळगावकर, पांडुरंग म्हादनाक, मंदार कोयंडे, संदीप डोळकर, संजय बांदेकर उपस्थित होते.