टुडे पान एक-अंगणवाडी पुरस्कारांचे आज वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-अंगणवाडी पुरस्कारांचे आज वितरण
टुडे पान एक-अंगणवाडी पुरस्कारांचे आज वितरण

टुडे पान एक-अंगणवाडी पुरस्कारांचे आज वितरण

sakal_logo
By

अंगणवाडी पुरस्कारांचे आज वितरण
२६ जणांचा समावेशः शासनाकडून उत्कृष्ट कामाची दखल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ः जिल्हा परिषदेमार्फत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून उद्या (ता. १४) पुरस्कार वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी सतोष भोसले यांनी दिली. एकूण २६ जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाडी स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श अंगणवाडी सेविका, एक आदर्श मिनी अंगणवाडी सेविका आणि एक आदर्श मदतनीस असे आठ तालुक्यांत २४ जणांना आदर्श पुरस्कार जाहीर केले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातून दोन आदर्श पर्यवेक्षिकांची निवड करण्यात आली. अशा २६ जणांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार सोहळा उद्या सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती, नवीन सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची तालुका निहाय निवड जाहीर करण्यात आली आहे. यातील आदर्श पुरस्कारांमध्ये देवगड तालुका-अंगणवाडी सेविका संजना देवळेकर (मुटाट-घाडीवाडी), मिनी अंगणवाडी सेविका प्रणाली कदम (पाटथर असरोंडी), अंगणवाडी मदतनीस रक्षिता गावकर (मीठमुंबरी), वैभववाडी- शशिकला हळदणकर (कोकिसरे विद्यामंदिर), संगीता कदम (दिगशी सोलकरवाडी), कांचन रावराणे (लोरे राणेवाडी), कणकवली-अपर्णा देसाई (कळसुली-गवसेवाडी अंगणवाडी केंद्र), स्मिता बोभाटे (नांदगाव-मधलीवाडी अंगणवाडी), विशाखा देसाई (कळसुली-गवसेवाडी केंद्र), मालवण-आराध्या वाळवे (त्रिंबक साटमवाडी), नंदिनी सावंत (वायंगणी-नळेकरवाडी), वैशाली लाड (नांदरुख कुर्लेभाटले), कुडाळ-मिताली देसाई (हुमळमळा बांधकोंड), मनीषा वेंगुर्लेकर (बाव-बागवाडी), समृद्धी मेस्त्री (पिंगुळी नवी खंबीरवाडी), वेंगुर्ले-गौरी देऊलकर, स्वप्नाली पालकर (पाल-खाजनादेवी), शीतल परब (भोगवे किल्ले निवती), सावंतवाडी- दीपिका बांदेकर, सुप्रिया वारंग (शेर्ले राऊतवाडी), अश्विनी राणे (इन्सुली डोबवाडी), दोडामार्ग- संयोगिता वाडकर (घोटगेवाडी खालचीवाडी), ललिता गवस (गिरोडे), अश्विनी ठाकूर (मोरेगाव गावठाण) यांचा समावेश आहे. तर आदर्श पर्यवेक्षिका म्हणून मालवण-मसुरे १ येथील उल्का खोत व कुडाळ माणगांव नं. १ येथील शैलजा मातोंडकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
................
चौकट
सिंधुसंवादचे अनावरण
पुरस्कार वितरण कार्यक्रमाबरोबरच माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बचतपत्र वितरण व महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रचार, प्रसिद्धीसाठी सिंधुकन्या व अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठी सिंधुसंवाद प्रणालीचे अनावरण जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते केले जाणार आहे.
..................