रेडीला शासनातर्फे 5 कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडीला शासनातर्फे 5 कोटीचा निधी
रेडीला शासनातर्फे 5 कोटीचा निधी

रेडीला शासनातर्फे 5 कोटीचा निधी

sakal_logo
By

रेडीला शासनातर्फे
५ कोटीचा निधी
वेंगुर्लेः रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी, रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी २.५० कोटी असा ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे. पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत २०२२-२३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३०.५१ लक्ष एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन १०८१५.१९ लक्ष एवढा निधी २०२२-२३ मध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे.
----------
निवृत्त कर्मचारी
संघाची आज सभा
सावंतवाडीः सावंतवाडी-दोडामार्ग तालुका निवृत्त कर्मचारी संघ, सावंतवाडी या संघटनेची मासिक सभा उद्या (ता. १४) सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय, जुना शिरोडा नाका, सालईवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीकांत पणदूरकर, रंजना निर्मळ यांनी केले आहे.
-----------
गोळवण गावाची
प्राथमिक निवड
मालवणः आदर्श गाव योजनेंतर्गत गोळवणची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार गावात ६ मार्चला विशेष ग्रामसभा घेऊन परिसरांची पाहणी करण्यात आली. या सभेत व परिसर पाहणीनुसार शासन निर्णयातील गाव व संस्था निवडीचे निकष, लोकसहभाग, संस्थेची तांत्रिक क्षमता, पाणलोट कामात असलेली प्रगती, ग्राम अभियानात असलेले सातत्य, संस्था व ग्रामस्थांचा समन्वय आदी निकषानुसार कागदपत्रांची पाहणी करून कार्यकारी सभेत झालेल्या निर्णयानुसार गोळवण गावाची व गावाच्या सहकार्यासाठी ग्रामसभेने निवडलेल्या श्री रामेश्वर कृषी युवा मंडळ, भिरवंडे (ता. कणकवली) यांची प्राथमिक निवड जाहीर करण्यात आली. याबाबत आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आदर्श गाव जिल्हा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना पत्र दिल्याची माहिती गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी दिली.
--------------
कर्तबगार महिलांचा
साळिस्तेत सन्मान
कणकवलीः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साळिस्ते ग्रामपंचायतीकडून गावातील महिलांना लोह व कॅल्शियम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आगळ्यावेगळ्या पध्दतीने महिला दिन साजरा करताना महिलांच्या आरोग्याची काळजी घेत सरपंच प्रभाकर ताम्हणकर व उपसरपंच जितेंद्र गुरव यांच्या हस्ते महिलांना या गोळ्या वितरित करण्यात आल्या. गावातील कर्तबगार महिलांचाही सन्मान करण्यात आला. ग्रामसेवक विशाल वरवडेकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी बारस्कर, प्रेमलता गुरव, मंगेश कांबळे, तेजस कुडतरकर, गिरीश कांबळे, हर्षदा ताम्हणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
कामगार संघटना
स्थापनेची मागणी
वेंगुर्लेः एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच भाजपची कामगार संघटना वेंगुर्ले डेपोमध्ये स्थापन करावी, यासाठी वेंगुर्ले डेपोतील चालक व वाहक यांनी भाजप कार्यालयात भेट घेऊन मागणी केली. भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, सरचिटणीस प्रशांत खानोलकर, शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, सरपंच संघटनेचे पपू परब तसेच एसटी कर्मचारी भरत चव्हाण, दाजी तळवणेकर, महादेव भगत, सावळ, तेजस जोशी, प्रशांत गावडे, मनोहर वालावलकर, मिलिंद मयेकर, सखाराम सावळ, रोशन तेंडोलकर आदी उपस्थित होते.
.....................