
संगित परीक्षेत यश
rat१३२७.txt
फोटो ओळी
-rat१३p२३.jpg ः
८८७८२
देवयानी जोशी
--
देवयानी जोशीचे संगीत प्रवेशिका पूर्ण परीक्षेत यश
मंडणगड ः गंर्धव संगीत महाविद्यालयाच्यावतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या संगीत प्रवेशिका पूर्ण या शास्त्रीय संगीताच्या शास्त्रीय गायन परीक्षा प्रकारात मंडणगड येथील देवयानी जोशी हिने विशेष योग्यतेसह उत्तीर्ण होऊन सुयश संपादित केले. आठवीत शिकणाऱ्या देवयानी हिने शास्त्रीय गायन या प्रकारातील १५० गुणांच्या लेखी परीक्षेत ५० पैकी ४१ तर प्रात्यक्षिक परीक्षेत ७५ पैकी ५९ गुण मिळवले. दापोली संगीत विद्यालय या परीक्षाकेंद्रातून ती या परीक्षेस प्रविष्ठ झाली होती. संगीत महाविद्यालयाने फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचा निकाल घोषित केला असून, परीक्षार्थीस नुकतेच गुणपत्रक पत्रक प्रदान केले आहे. देवयानीला कुडावळे दापोली येथील संगीतशिक्षिका विणा महाजन मार्गदर्शन करत आहेत. शास्त्रीय संगीत परीक्षेत तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
---
फोटो ओळी
-rat१३p२४.jpg ः
८८७८३
मंडणगड ः अभ्यास सहलीमध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी.
--
मुंडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने वेळास या ठिकाणी अभ्यास सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरचे जग, निसर्ग, प्राणी, पक्षी तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्राणीशास्त्र जाणून घेण्याची आवड निर्माण व्हावी, निसर्गाविषयी व प्राण्यांविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने वेळास समुद्रकिनारा येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये प्राचार्य डॉ. राहुल जाधव व प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. शैलेश भैसारे सहभागी झाले होते. या वेळी वेळास येथील समुद्र किनाऱ्यावर कासव अंडी घालण्यासाठी कशाप्रकारे येतात या विषयी प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. या सहलीमध्ये प्राणीशास्त्र विषयाचे प्रथम व द्वितीय वर्गातील एकूण २४ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
-
फोटो ओळी
-rat१३p२५.jpg ः
८८७८४
बुरी ः शिमगोत्सवात सहभागी बुरी येथील ग्रामस्थ.
--
बुरीमध्ये शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा
मंडणगड ः तालुक्यातील बुरी गावी सर्व ग्रामस्थांनी गावाचा शिमगोत्सव सालाबादप्रमाणे विविध प्रथा व कार्यक्रमांनी साजरा केला. या निमित्ताने गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले. गावदेवीची पालखी खालू बाजाच्या तालावर नाचवत गावात फिरवण्यात आली. शिमगोत्सवानिमित्त होम खेळी, शरण इत्यादी कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
-