प्रगत समाजाकरिता महिला सक्षम होणे गरजेचे

प्रगत समाजाकरिता महिला सक्षम होणे गरजेचे

rat१३३.txt


फोटो ओळी
-rat१३p३०.jpg ः
८८८१८
मंडणगड ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगरसेविका राजेश्री सापटे सोबत किरण कांबळे, समिक्षा लोखंडे व अन्य.
--
महिला सक्षम होणे गरजेचे

नगरसेविका राजेश्री सापटे ; धुत्रोलीतील आयटीआयमध्ये कार्यक्रम

मंडणगड, ता. १३ ः कुटुंब व समाजाच्या प्रगतीकरिता महिलांनी सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मंडणगड नगरपंचायतीच्या नगरसेविका राजेश्री सापटे यांनी केले.
धुत्रोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी महिलांनी जीवनात प्रत्येक नवीन काम कला आत्मसात करण्याच्या उद्देशाने व आव्हान स्वीकारण्याच्या उद्देशाने आवाहन केले. जीवनात सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या उद्देशाने कार्यरत राहण्याचा तसेच बदलत्या काळात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आपल्या कुटुंबाचा आधार होण्याचा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला तसेच बदलत्या काळात औद्योगिक तंत्रशिक्षणाचे महत्व त्यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमास प्रशिक्षण संस्थेचे समिक्षा लोखंडे, जगताप, पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने प्रशिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी कदम हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com