मंडणगड ः वन्यजीव धोक्यात

मंडणगड ः वन्यजीव धोक्यात

KOP23L88851- संग्रहित

मंडणगड तालुक्यात वन्यजीव धोक्यात

शिकारीची माहिती आरोपींनी दिली; वन्यजीवांच्या हालचालीवर हवी नजर
मंडणगड, ता. १३ ः बदलत्या काळात विविध कारणांनी मानवाने वनांवर केलेल्या अतिक्रमणामुळे तालुक्यातील वन्यजीवन धोक्यात आलेली असल्याची साक्ष वेळोवेळी मिळत असल्याने या संदर्भात वनविभागाने आता जनजागृतीसह विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्यात मंडणगडमध्ये बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना नवी मुंबईत अटक करण्यात आली. ही शिकार मंडणगड तालुक्यातील जंगलात झालेली असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या संदर्भात स्थानिक विभागाचे एक पथक तपासणी करणार आहे.
मंडणगड तालुक्यातील ९० टक्क्याहून अधिक क्षेत्र हे खासगी मालकीच्या ताब्यातील आहे. वनविभागाच्या ताब्यात नगण्य असे वनक्षेत्र आहे. तालुक्यातील वन्यजीवांची संख्या काही ठराविक कालावधीत मोजण्यासाठी त्यांचे संख्यात्मक सर्व्हेक्षण व दुर्मिळ वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारी प्रभावी यंत्रणा शासनाने निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तालुक्यात ससे, कोल्हे, तरस, वाघ, भेकरे हरीण, रानडुक्करे, खवलेमांजर, मोरे, घोरपड इत्यादी वन्यजीव आढळून येतात. यातील वाघाच्या वंशात बसणारा बिबट्या हा वन्यजीव येथील जंगलात सर्रास आढळून येतो. त्यांची संख्या किती आहे, याची अधिकृत आकडेवारी अद्याप पुढे आलेली नसली तरी पूर्ण तालुक्यात बिबट्यांचा संचार मात्र दिसून आला आहे.
जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे येथील पांरपरिक शेती धोक्यात व दुबार शेती धोक्यात आलेली आहे. शेतीच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने रानडुकरांचा उपद्रव रोखण्याकरिता फासकीचा वापर केला जातो याशिवाय बेकायदेशीरपणे रानडुक्कराची शिकार करण्यासाठी फासकीचा वापर केला जातो. दुर्दैवाने, रानडुकरासाठी लावलेल्या फासकीचा फास डुकरांपेक्षा बिबट्यांवरच अधिक आवळला गेल्याचे अनेक प्रकरणात पुढे आले आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यातही वडवली येथील रान डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकून जीवांच्या आकांताने ओरडल्याचे तालुकावासीयांच्या निदर्शनास आले. सुदैवाने वनविभागाने अथक प्रयत्नाने त्यांचा जीव वाचवून सुरक्षित आवासातही सोडले गेले.
मुंबईत सापडलेल्या आरोपितांच्या कथनानुसार त्यांची मंडणगड तालुक्यातील जंगलात बिबट्याची शिकार केली. बिबट्या वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी मानवी प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. तशी मागणी येथील वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

कोट
पृथ्वीवर राहण्याचा माणसाइतकाच अधिकार अन्य प्राण्यांचा आहे कारण, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बिबट्या हा वन्यजीव अत्यंत महत्वाची भूमिका अदा करत असतो. ही बाब लक्षात घेता तालुक्यात बेकायदेशीरपणे होणाऱ्या शिकारीवर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसणे आवश्यक आहे.
--शैलेश घोसाळकर, प्रगतशील शेतकरी, सावरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com