चिपळुणात आज आणि उद्या नाट्यरंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात आज आणि उद्या नाट्यरंग
चिपळुणात आज आणि उद्या नाट्यरंग

चिपळुणात आज आणि उद्या नाट्यरंग

sakal_logo
By

rat१३३४.txt

चिपळुणात आज, उद्या नाट्यरंग

चिपळूण, ता. १३ ः नाट्यचळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या नाटक कंपनी चिपळूणच्या वतीने मंगळवारी (ता. १४) व बुधवारी (ता. १५) मार्च असे दोन दिवस नाट्यरंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसात संगीतमल्लिका व चित्रकथी अशा दोन सुंदर नाट्यकृती रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.
नाटक कंपनी चिपळूणने आजवर नाट्य चळवळ जिवंत राहावी यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. नवीन पिढीमध्ये नाट्य कलागुण वाढीला लागावेत म्हणून ही संस्था गेली काही वर्षे हिरीरिने प्रयत्न करत आहे. हाऊसफुल्ल या नावाने सलग तीन वर्षे एकांकिका, प्रहसने यांना संधी दिली गेली आहे. बाल बाल देखो बालनाट्य, हास्यतराना असे अनेक उपक्रम संस्थेने राबवले आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रमातून नाट्यचळवळ पुढे नेत असताना सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नाट्यसंस्था चिपळूण सामाजिक कार्यालयातही सरसावली आहे. कोविड काळात काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी अशा आठ विभागांना एकत्र आणून कोविड फायटर क्रिकेट लिग आयोजित केली होती. सर्व कोविड योद्धे यांचा सन्मान करणे हा त्यामागचा हेतू होता. नाट्यरंगमध्ये आज सोमवारी माहोल क्रिएशन, मुंबईचे चित्रकथी तसेच रत्नागिरीतील वरवडे-खंडाळा येथील कलारंग नाट्यप्रतिष्ठानचे संगीतमल्लिका अशी दोन दर्जेदार नाटके रसिकांना पाहता येणार आहेत. या नाटकांच्या उद्घाटन समारंभाला यशस्वी उद्योजक प्रशांत यादव, ठाकरे गट शिवसेना शहरप्रमुख उमेशशेठ सकपाळ, लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, क्रिकेट असो. तालुकाध्यक्ष, दशरथशेठ दाभोळकर, अर्बन बँक संचालक मोहनशेठ मिरगल, जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त समीर शेट्ये, लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोणबरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशापांडे, माजी सभापती पूजा निकम, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, ॲड. ओवेस पेचकर, भाजप शहराध्यक्ष आशिष खातू आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ ते १२ या वेळेत ही नाटके रसिकांना श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या दै. सागर रंगमंचावर विनामूल्य पाहाता येणार आहेत. या उपक्रमाला सर्वांना उपस्थित राहावे, असे आवाहन नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष राऊ चिंगळे, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, सावरी शिंदे, श्रवण चव्हाण, आदेश कांबळी, रसिक जोशी आदींनी यांनी केले आहे.