चिपळूण - चिपळूणला मिळणार जादा वाहतूक पोलिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूणला मिळणार जादा वाहतूक पोलिस
चिपळूण - चिपळूणला मिळणार जादा वाहतूक पोलिस

चिपळूण - चिपळूणला मिळणार जादा वाहतूक पोलिस

sakal_logo
By

(टीप- आज बीग स्टोरी लागली आहे.)

सकाळ बातमीचा परिणाम---लोगो

चिपळूणला मिळणार जादा वाहतूक पोलिस
पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव ; वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढणार
चिपळूण, ता. १३ ः शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जादा पोलिस नेमण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर चिपळूणला जादा वाहतूक पोलिस मिळतील अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताराम शेळके यांनी दिली. चिपळूणची सिग्नल यंत्रणा २३ वर्षे बंद आहे. वाढत्या शहरीकरणासाठी जादा पोलिस गरजेचे असल्याचे वृत्त आज ''सकाळ''मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताराम शेळके यांनी घेतली.
ते म्हणाले, चिपळूण शहरात रस्ते अरूंद आहेत. शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या चिपळूण शहरात केवळ चार वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांची मदत घेऊन आम्ही वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र वाढते शहरीकरण आणि वाढलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता जादा वाहतूक पोलिसांची गरज आहे. तशी मागणी आम्ही जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. लवकरच चिपळूणसाठी जादा पोलिस कर्मचारी दिले जातील.
चिपळूण शहरात कुठे पोलिस चौकी निर्माण केली पाहिजे. जादा पोलिस कर्मचारी कुठे नेमले पाहिजेत याचा पोलिसांकडून काही दिवसांपासून अभ्यास सुरू आहे. त्या दृष्टीने नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे परवानगी मागितली आहे. वर्षभरात येणारे विविध सण, गणपती, दिवाळी, उन्हाळा, मे महिना व नाताळची सुट्टी लक्षात घेऊन होणारी गर्दी लक्षात घेऊन आम्ही नियोजन करत आहोत. बहादूरशेख नाक्यावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. येथे एकेरी मार्ग सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी भेडसावत आहे. येथील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पर्यायी रस्ते तयार करण्याचे पूर्ण झाल्यानंतर बहादूरशेख नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पुढील काही दिवसात बहादूरशेख नाका येथील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. तत्पूर्वी आम्ही महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीकडूनही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मदत घेत आहोत.