वराडमध्ये विविध विकासकामे

वराडमध्ये विविध विकासकामे

swt1330.jpg
88845
वराडः विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत सरपंच शलाका रावले यांच्या करण्यात आले.

वराडमध्ये विविध विकासकामे
नीलेश राणेंचा पाठपुरावाः रस्ता डांबरीकरण, स्मशानशेड दुरुस्तीचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : जिल्हा वार्षिक योजनेतून वराड गावात मंजूर झालेल्या सहा विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच शलाका रावले यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या वराड गावातील सावरवाड वराड मुख्य रस्ता डांबरीकरण, वराड वावुळवाडी रस्ता डांबरीकरण, वराड म्हावळुंगेवाडी रस्ता डांबरीकरण, वराड कट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता डांबरीकरण, पालववाडी विजय पालव यांच्या घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण, वराड शेटयेवाडी स्मशानभूमी शेड बांधणे आदी सहा कामांची भूमिपूजने झाली. ही कामे मंजूर होताना वरिष्ठांच्या मार्गर्शनाखाली माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
यावेळी संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच शलाका रावले, उपसरपंच गोपाळ परब, ग्रामपंचायत सदस्य यांसह बबन पांचाळ, शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगावकर, भाजप पदाधिकारी, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, हरेश गावकर, नारायण लुडबे, भाजप वराड सोशल मीडिया प्रमुख निखिल घोगळे तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. गेली कित्येक वर्षे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून वराड गावात जेवढा निधी आला नाही, त्यापेक्षा जास्त निधी केवळ सहा महिन्यांत भाजप युती सरकारच्या माध्यमातून माजी खासदार राणे व पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून वराडमध्ये आला आहे. गावातील उर्वरित विकासकामांचा पाठपुरावा करून ती कामेही राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे, अशी माहिती संतोष साटविलकर व राजन माणगावकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com