केळशीजवळील वणव्यात आंबा, काजू बागांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळशीजवळील वणव्यात आंबा, काजू बागांचे नुकसान
केळशीजवळील वणव्यात आंबा, काजू बागांचे नुकसान

केळशीजवळील वणव्यात आंबा, काजू बागांचे नुकसान

sakal_logo
By

rat१३४१.txt

बातमी क्र..४१ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat१३p३३.jpg ः
८८८४२
रोवले ः वणव्यात भस्मसात झालेली काजूची झाडे.
--

केळशीजवळील वणव्यात आंबा, काजू बागांचे नुकसान

दाभोळ, ता. १३ ः दापोली तालुक्यातील केळशीजवळ असलेल्या रोवले परिसरात वणवा लागल्याने मोठ्या प्रमाणात बागांचे नुकसान झाले आहे. ९ मार्चला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा वणवा लागला. स्थानिकांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा रात्री ११ वा. तो आटोक्यात आणण्यात यश आले. या वणव्यात रोवले येथील अनंत परांजपे यांच्या आंबा व काजू बागेचे मोठे नुकसान झाले आहे. सुनील चिखले, बाबू चिखले, परदेशी, कृष्णा चव्हाण, पराग पंडित, विजया मांडवकर, नरेश बंगाल आदी शेकऱ्यांच्या आंबा व काजूच्या बागांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात या भागातील आंबा व काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यातून काही झाडे वाचली होती व त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आंबा व काजूची लागवड केली होती; मात्र या वणव्यात या झाडांचे नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी रडकुंडीस आला आहे.

------------------------