
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघाना 4 वर्ष सक्तमजुरी
rat१३३६. txt
बातमी क्र.. ३६ ( पान ३ साठी)
प्रौढाच्या आत्महत्ये प्रकरणी दोघांना सक्तमजुरी
प्रत्येकी ७ हजाराचा दंड ; भावाच्या तक्रारीतून प्रकरण उघड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी एका प्रौढाला संशयातून मारहाण करून व वेळोवेळी धमकावून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांना न्यायालयाने ४ वर्षांची सक्तमजुरी व ७ हजार रुपयांचा दंड सुनावला. संतोष सखाराम कांबळे आणि मिलिंद देवजी कांबळे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना ९ एप्रिल २०२१ ला घडली होती.
दोन वर्षांपूर्वी संशयितांनी एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत भिकाजी कांबळे यांना शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेतून ९ एप्रिलला भिकाजी कांबळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी भिकाजी यांच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांचा भाऊ मयत भिकाजी हे अशिक्षित होते. ते घरात एकटाच राहायचे. एका महिलेशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून संशयित त्यांना दमदाटी करायचे. ७ एप्रिल २०२१ ला संशयितांनी त्यांना सर्वांसमोर मारण्याची धमकी दिली होती. याची माहिती त्यांनी मुंबईतील भावाला दिली होती. त्रासाला कंटाळून गावचे पोलिसपाटील यांच्याकडे जाऊन अशिक्षित असल्याने मला पोलिस ठाण्यात तक्रार द्यायची असल्याने तशी चिठ्ठी लिहून द्या, असे सांगितले होते. त्यानुसार पोलिस पाटलांनी त्यांना चिठ्ठी लिहून दिली होती. ही चिठ्ठी पँटच्या खिशात ठेवून ९ एप्रिलला रात्री भिकाजी यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष आणि मिलिंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. जाधव आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. वाय. जाधव यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी १३ साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोघा संशयितांना दोषी ठरवले. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.