
कुलगुरुंच्या नियुक्तीसाठी शोध समिती
rat१३४५.txt
कुलगुरुंच्या नियुक्तीसाठी शोध समिती
दाभोळ, ता. १३ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांची कुलगुरूपदाची मुदत संपत आल्याने नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी शोध समिती गठित करण्यात आली असून या समितीकडून कुलगुरू पदासाठी ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोकण विभाग असून, या विद्यापीठांतर्गत ७ घटक (कॉन्स्टिट्युएन्ट) व २१ खासगी- कृषी व संलग्न विद्या शाखेतील महाविद्यालये असून त्यांच्यामार्फत विद्यावाचस्पती पदवीसह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यापीठाचे संशोधन कार्य १९ संशोधन केंद्रांमार्फत स्थानिक गरजा व संशोधनाची आवश्यकता विचारात घेऊन केले जाते. या शोधसमितीने केंद्रीय मत्स्य शिक्षणसंस्था, वर्सोवा (मुंबई) चे सहसंचालक डॉ. एन. पी. साहू यांची समन्वयक म्हणून निवड केली असून या संदर्भातील सर्व पत्रव्यवहार त्यांच्याकडे करण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
-