शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन प्रशिक्षण

शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन प्रशिक्षण

rat१३४८. txt

शोभिवंत मत्स्यपालन, व्यवस्थापन प्रशिक्षण


रत्नागिरी, ता. १३ ः शहराजवळील शिरगाव येथील कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्यसंवर्धन विभागातर्फे येत्या १६ ते १८ मार्च या कालावधीत शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. प्रशिक्षणार्थींची संख्या २० पर्यंत मर्यादित असून प्रत्यक्ष उपस्थितीसह प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. या प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता प्रत्येक प्रशिक्षणार्थींना ३ हजार इतके प्रशिक्षण शुल्क जमा करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण कालावधीत आपल्या निवासाची व जेवणाची व्यवस्था व प्रवासखर्च स्वतः करावयाचा आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमात शोभिवंत मत्स्यसंवर्धन प्रकल्पासाठी जागा निवड, शोभिवंत मत्स्यसंवर्धन आवश्यक उपकरणे व वापर, जिवंत व कृत्रिम खाद्यनिर्मिती, आरोग्य व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल याविषयी विस्तृत माहिती व प्रात्यक्षिक देण्यात येईल. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावनोंदणीसाठी प्रशिक्षण समन्वयक डॉ. राजू तिबिले, डॉ. वर्षा भाटकर डॉ. संगीता वासावे, अपूर्वा सावंत आणि आयोजक डॉ. सुरेश नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com