प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा मालवणात स्नेहमेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा मालवणात स्नेहमेळावा उत्साहात
प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा मालवणात स्नेहमेळावा उत्साहात

प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा मालवणात स्नेहमेळावा उत्साहात

sakal_logo
By

प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा
मालवणात स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : अनेकवेळा शासनाला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदने दिली. अनेकवेळा भेटी घेऊन प्रत्यक्ष समस्या मांडल्या, तरीही शासन त्यावर योग्य निर्णय अद्यापही घेत नसल्याने आपल्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी प्रसंगी उपोषण आंदोलन करण्याचे आश्वासन सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिले.
जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या मालवण शाखेतर्फे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचा मेळावा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील दैवज्ञ भवन येथे झाला. तालुकाध्यक्ष चौकेकर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्याचा अध्यक्ष कालावधीत निश्चित प्रयत्न करेन, असे सांगितले. जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, जिल्हा सदस्य रुद्राजी भालेकर, सरिता मुननकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दत्ताराम पटनाईक, सचिव रामनाथ राऊळ, सदस्य कल्याण कदम, जिल्हा सदस्य प्रताप बागवे, कृष्णा पाताडे, माजी तालुकाध्यक्ष उत्तम कदम, तालुका उपाध्यक्ष श्यामसुंदर माळवदे, ज्ञानदेव ढोलम, माधव गावकर, मनाली फाटक आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. किरण गोसावी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आपले कलागुण सादर केले. यात सदानंद कांबळी, मनाली फाटक, रुपाली पेंडूरकर, आनंद धुत्रे, दीपक पातार्डे, विजय चौकेकर आदींनी कलाविष्कार सादर केले. माधवराव गावकर यांच्या नाट्यसंगीत मैफिलीचा आस्वाद उपस्थितांनी लुटला. सुंदर पारकर, नारायण सावंत, दत्ताराम पटनाईक, उत्तम कदम, प्रताप बागवे, कृष्णा पाताडे यांनी मार्गदर्शन केले.