रत्नागिरी ः जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपात होणार सामिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपात होणार सामिल
रत्नागिरी ः जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपात होणार सामिल

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 15 हजार कर्मचारी संपात होणार सामिल

sakal_logo
By

जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी संपावर
अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासन सज्ज ; पोलिस, होमगार्डची मदत
रत्नागिरी, ता. १३ ः सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अन्य क्षेत्रातील १५ ते १७ हजार कर्मचारी मंगळवारी (ता.१४) राज्यव्यापी संपामध्ये सहभागी होणार आहेत. संपामुळे शासकीय कामे ठप्प होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने संपाला तोंड देण्यासाठी तयारी केली असून अत्यावश्यक सेवेसाठी पोलिस दल आणि होमगार्डवर भिस्त राहणार आहे.
संप यशस्वी करण्यासाठी नुकतीच सर्व संघटनेच्या समन्वयकांची बैठक झाली. त्यामध्ये उद्याचा संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी केला. जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र भोजे यांनी तसे स्पष्ट केले; मात्र संप टाळण्यासाठी शासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. मंगळवारी रत्नागिरीतील सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर अन्य तालुक्यातील सर्व कर्मचारी तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी ११ वा. एकत्र येणार आहेत. या ठिकाणी संपाच्या पुढील वाटचालीसंदर्भात उपस्थितांना माहिती देण्यात येणार आहे. संपकाळात कोणत्याही कर्मचाऱ्याने आपले सध्याचे निवासाचे ठिकाण सोडून बाहेर जाऊ नये, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
जिल्हा प्रशासनाने संपकाळात अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली; परंतु सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सामिल होणार असल्याने प्रशासकीय कामं ठप्प होणार आहेत. सर्व फायली आहेत त्या टेबलवर राहणार आहेत; परंतु या संपकाळात अत्यावश्यक सेवा सुरू राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलिसदल आणि होमगार्डची मदत घेतली आहे. रुग्णवाहिकेसह अन्य कुठेही काही गरज भासल्यास चालक म्हणून पोलिस कर्मचारी किंवा होमागार्डची मदत घेतली जाणार आहे.

कोट
संपकाळामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहावी यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्हा पोलिसदल आणि होमगार्डची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.
- श्रीकांत गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी